नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर केंद्रातील ज्या खासदारांना व मंत्र्यांना आमदारकीची निवडणूक लढवण्यास भाजपने सुचवले होते आणि ते निवडून आलेले आहेत, अशा खासदारांचे राजीनामे स्वीकारण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार केंद्रातील तीन केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत.
केंद्रातील केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, ग्रामविकास व जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल, रेणुकासिंह सरिता यांनी राजीनामे दिले असून, नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडील कृषिमंत्री पदाचा पदभार केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या तीनही केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले, अर्थात कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे











