इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नियती फार क्रूर असते असे म्हणतात, तिचं कर्तुत्व कळायला काही काळ लागतो, पण नियतीचे फासे एकदा का उलटे पडायला लागले, की कोणालाच काही सुधरत नाही. काही दिवसांपूर्वीच ज्याच्यामुळे एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी गेला, त्याचं एक पडद्याआडचं कृत्य सध्या निरा नदीकाठच्या गावात गाजतंय.
या आठवड्यात एक व्हिडिओ क्लिप अचानक व्हायरल झाली आणि इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठच्या काही गावात याची कुजबूज सुरू झाली. 30 सेकंदाच्या या क्लिपमध्ये उसाच्या पिकातील नको ते कृत्य की, ज्याचा व्हिडिओ संबंधितानेच घेतला होता, तो अचानक अनेकांच्या मोबाईलवर पोहोचला.
त्याचं झालं असं की, दोन तीन दिवसांपासून नीरा नदीकाठच्या इंदापूर, बारामती, फलटण नजीक असलेल्या या मोठ्या गावातून सोशल मीडियात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. विशेष म्हणजे ज्याने ही क्लिप काढली, त्याच्याकडूनच ती व्हायरल झाल्याची चर्चा आहे. म्हणजे हा व्हिडिओ स्टेटसला ठेवला गेल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये जवळपास अर्ध्या मिनिटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, एका उसाच्या पिकातील हा व्हिडिओ आहे.
अर्थात मोबाईल मधलं काय माहित नसेल, तर आपण गप्प बसावं, पण अलीकडे बऱ्याच जणांना स्टेटस ठेवायची भलतीच हौस असते. कुठेही फोटो काढायचा कुठेही व्हिडिओ घ्यायचा आणि लगेच तो स्टेटस ठेवायचा. ग्रामीण भागामध्ये तांत्रिक कौशल्य किंवा तांत्रिक ज्ञान माहीत नसतानाही स्टेटस वर ठेवणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अशातलाच हा एक असावा, ज्याने आपणच केलेल्या कृत्याचा एक व्हिडिओ जाणीवपूर्वक घेतला आणि तोच व्हिडिओ स्टेटसवर ठेवल्याने सबंध गावात पोहोचला.
अर्थात याची सध्या कुजबूज सुरू आहे, परंतु हे जरी अजाणतेपणी किंवा माहीत नसताना झाले असावे अशी चर्चा असली, तरी देखील आणखी एक चर्चा जोडीला आहे, ती म्हणजे नियतीने दाखवलेल्या चमत्काराची! नियती आपले फासे वेळेवर टाकत असते. एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी ज्या गावात गेला, ज्याच्याकडून गेला त्याच्या बाबतीतच आता हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. आता ही घटना नेमकी काय वळण घेते याची गावकऱ्यांना उत्सुकता आहे.











