• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल 33 लाखांचे हिऱ्यांचे अर्धा किलो सोने!  डॉक्टरच्या घरात झालेल्या चोरीला पुरावाच नव्हता.. पण कोतवाली पोलिसांचा भारीच फंडा; एसपींनी चक्क ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले..! 

tdadmin by tdadmin
December 5, 2023
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
तब्बल 33 लाखांचे हिऱ्यांचे अर्धा किलो सोने!  डॉक्टरच्या घरात झालेल्या चोरीला पुरावाच नव्हता.. पण कोतवाली पोलिसांचा भारीच फंडा; एसपींनी चक्क ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले..! 

नगर : महान्यूज लाईव्ह 

नगर शहरातील माणिक नगर या उच्चभ्रू वसाहतीत डॉक्टर ऋषभ फिरोदिया यांच्या घरात अचानक चोरी झाली. अत्यंत उच्चभ्रू असलेल्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आणि या चोरीत जो ऐवज गेला होता, त्यामुळे तर याची चर्चा जास्त झाली; कारण तब्बल 33 लाख रुपयांचे हिऱ्यांचे 550 ग्रॅम चे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

अर्थात तांत्रिक विश्लेषणाची जोड पोलीस तपासाला अलीकडच्या काळात मिळाली असली, तरीही जुन्या काळातील पोलिसांची तपासाचे जे मानसिक कौशल्य आहे, त्या कौशल्याच्या आधारे पोलिसांनी केलेला तपास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आणि या घटनेतील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला.

 या तपासात ज्या पद्धतीने पोलिसांनी कच्चे दुवे व धागेद्वारे शोधले, त्यामुळे प्रभावित होऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चक्क कोतवाली पोलिसांना 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

पोलिसांनी सफाईदारपणे उघडकीस आणलेल्या  या चोरीतील 33 लाखांचे हिऱ्यांचे 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात राहुरीतील दीपक सर्जेराव पवार (वय 32, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) याला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यातील मिळालेली माहिती अशी की डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी एक वेळ नाही तर दोन वेळा चोरी झाली होती. 23 आणि 28 आॅक्टोबरच्या दरम्यान झालेल्या या चोरीत फिरोदिया यांच्या घराच्या कपाटातील 55 तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू असे चोरीला गेले होते. याशिवाय एक घड्याळ आणि 17 हजार रुपयांचा रोख रक्कम, असा मोठा मुद्देमाल चोराने चोरून नेला होता. 

डाॅ. ऋषभ फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांसह चोरीच्या घटनास्थळी 4 ते 5 वेळा तपासणी केली. चोरांनी सफाईदारपणे चोरी केली होती. त्यामुळे तपासाचे आव्हान होते. तपास सुरू झाला, पण सुरूवातीला धागेदोरे हाती लागत नव्हते. परंतु तपासात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहकाऱ्यांसह सातत्य ठेवले. सीसीटीव्हीची तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली. 

तब्बल सत्तर ठिकाणच्या दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांनी केली. एका ठिकाणी फक्त तीन सेकंदामध्ये असलेल्या फुटेज मधून आरोपीचा सुगावा लागला, मात्र दुसरीकडे चोरीची पद्धत आणि तपासातील मानसिक कौशल्य याच्या आधारे झालेल्या तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला तपासाच्या पुढच्या सूचना केल्या. यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवार भोवती सापळा आवळला. दीपक पवार याला राहुरी बसस्थानक परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.  दीपक पवार सुरूवातीला काहीच सांगत नव्हता. दिशाभूल करत होता. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता चोरी केलेले बरेच सोने हे घरी असून काही सोने सेलू परभणी येथील 2 सराफाला विकाल्याचे त्याने कोतवाली पोलिसांना सांगितले. 

कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफाकडून आणि दीपक याच्या घरातून सोन्याचे 550 ग्रॅम दागिने जप्त केले. दीपक पवार याला न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, पोलीस जवान तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, लोणी पोलीस स्टेशनचे रविंद्र मेढे, दक्षिण मोबाइल सेल चे राहुल गुंड हे पथक तपासात सहभागी झाले होते.

Next Post
थेट पाकिस्तान मध्ये घुसून… 26/11 चा बदला कोणी घेतलाय का?

थेट पाकिस्तान मध्ये घुसून... 26/11 चा बदला कोणी घेतलाय का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group