कधी कधी असं म्हणतात की, लग्न म्हणजे 1760 विघ्न! अशी विघ्न कोणाच्या नशिबात कशी येतील सांगता येत नाही. काल परवा बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात घडलेल्या घटनेने मात्र तुम्ही एक तर हसाल किंवा कपाळावर हात मारून घ्याल.!
नवरदेवाने हवा करायची आणि बायकोची ही हौस भागवायची म्हणून भरमसाठ पैसे खर्च करून हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं आणि हेलिकॉप्टरनेच बायकोला न्यायचं असं ठरवलं, पण आस्मानी आणि सुलतानी संकटाचा त्यांना सामना करावा लागला.
प्रशासनानं या हेलिकॉप्टरला लवकर उतरण्यास परवानगी दिलीच नाही, मग मुहूर्त तर चुकत चालला. पायलटला सूचना केली आणि हवेतच सात फेरे घेतले. या घटनेने उपस्थित साऱ्यांना तर हसू आवरलं नाहीच, पण या घटनेची चर्चा अचानकच देशभर झाली.
त्याचा असं झालं की, लग्नाच्या दिवशी मुलीचे पिता डॉक्टर रामानंद दास यांच्या पत्नी नुकत्याच दवाखान्यातून परतल्या होत्या. त्यांची इच्छा होती की, आपल्या मुलीची विदाई ही हेलिकॉप्टरने करायची त्यानुसार सगळी जय्यत तयारी करण्यात आली होती. नवरदेवाने सांगितलं आम्ही हेलिकॉप्टर घेऊन येणार आहोत.
ही घटना बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील! या गावात मग नवरीच्या एका शेतात हेलिपॅड बनवलं. परंतु जिल्हा प्रशासनांना सुरक्षेचा मुद्दा पुढे करत या हेलिकॉप्टरला लँडिंगला परवानगी दिली नाही. शेवटी हेलिकॉप्टरला एअरपोर्टवर पुन्हा परतावं लागलं. मात्र एअरपोर्टवरून पुन्हा हेलिकॉप्टरने ज्या गावात लग्न होतं, त्या मोहदीपूर गावाच्या वरती सात वेळा चक्कर मारली. म्हणजेच सात फेरे घेतले. मोहदी पुर येथील डॉक्टर रामानंद दास यांच्या मुलीच्या लग्नात घडलेल्या या प्रकाराची चर्चा सध्या सुरू आहे











