दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराज यात्रेसाठी आलेल्या खेळणी विकणाऱ्या व पाळणा व्यावसायिक अशा वंचित घटकातील कष्टकरी, मजुरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना थंडीची उणीव भासू नये, यासाठी जर्किंगचेचे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पाटस पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
सध्या थंडीचे दिवस आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त तसेच गावागावातील यात्रेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या, लहान मुलांची खेळणी विकणारे, पाळणेवाले तसेच इतर छोटे-मोठे व्यवसायिक कष्ट करणाऱ्या भटक्या समाजातील वंचित घटकांच्या लहान मुलांना पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या वतीने शनिवारी ( दि २५) ५० जर्किंगचे वाटप करण्यात आले.
कडाक्याच्या थंडीत उबदार जर्किंग मिळाल्याने या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व या वंचित घटकाच्या कुटुंबांनी कौतुक केले. याप्रसंगी पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे संस्थापक विनोद कुरुमकर, मार्गदर्शक जुनेद तांबोळी, अध्यक्ष गणेश जाधव,उपाध्यक्ष राजु गोसावी, सचिव गणेश शितोळे, कार्याध्यक्ष विठ्ठलशेठ वाळुंजकर, खजिनदार प्रकाश भागवत, दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अमरसिंह परदेशी, पत्रकार राजेंद्र झेंडे, सामाजिक कार्यकर्ते संदिप पोळेकर आदी उपस्थित होते.











