सुनीलकुमार मुसळे, (स्वीय सहाय्यक, उपमुख्यमंत्री अजित पवार)
अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तुळजापुरला चालत निघालेल्या सागरला पाहून मला चन्नया हिरेमठ स्वामी आठवले.. ‘पण’ ला मराठी व्याकरणात महत्व आहेच, पण मानवी व्यवहारात खूप महत्व आहे.
एखादा माणूस अमुक गोष्ट झाल्याशिवाय मी हे करणार नाही असा पण करतो. पण म्हणजे निर्धार. आणि असा पण करणारी लोक निश्चयी, त्यागी असतात. काहींचे पण मनातल्या मनात असतात तर काहींचे जाहीर असतात.मनात केलेला पण इतरांना माहिती नसतो त्यामुळे तो कडेला नाही गेला तर चालू शकतो मात्र जाहीरपणे केलेला पण मात्र पूर्ण होईपर्यत काम करावे लागते..
मी लहानपणी सोलापूरच्या जुन्या आडत बाजारात जायचो .गावाकडच्या लोकांच्या जेवणाची सोय म्हणून भाकरी द्यायला जायचो.एकदा असाच गेलो असताना एका दुकानातील दुकानदार अंगरखा न घालता बसला होता. त्या दुकानाच्या बाहेर खुप गर्दी होती.एवढ्या मोठ्या दुकानाचा मालक अंगरखा न घालता कसा बसलाय? असा प्रश्न निर्माण झाला.
घरातील चुलतभाऊला विचारले असता समजले की, त्या आडत दुकानदारांचे नाव चन्नय्या स्वामी हिरेमठ होते. ते मोरारजी देसाई यांचे चाहते होते. मोरारजी देसाई यांचा पराभव झाला होता. त्याचे त्यांना शल्य होते. जोवर मोरारजी देसाई विजयी होतं नाहीत तोवर मी अंगरखा घालणार नाही असा पण त्यांनी केला होता. एकदिवस मोरारजी देसाई जिंकले आणि त्यांनी अंगरखा घातला..
स्वामी स्वातंत्र्यसेनानी होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्य चळवळ सुरु असताना त्यांनी ‘जोवर भारताला स्वातंत्र्य मिळत नाही तोवर मी लग्न करणार नाही असा पण केला. स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या ब्रिटिशविरोधी कारवायामुळे त्यांना बराच काळ तुरुंगात जावे लागले पण ते डगमगले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मगच त्यांनी लग्न केले. तेव्हा त्यांच्या वयाची तिशी ओलांडली होती.आयुष्यात स्वामींनी दोन पण केले आणि ते पूर्ण केले..
स्वामींची गोष्ट मला आठवली, कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारा एक कार्यकर्ता मुंबई नेरुळवरून तुळजापूरला चालत निघाला आहे. सागर पवार त्याचे नाव! अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तो गडी चालत तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालाय. थंडीचे दिवस सुरु आहेत. सायंकाळी लवकर थंडी सुरु होतेय, सकाळही अगदी कडकडीत ऊन येईपर्यंत थंडी असते. अशा वातावरणात सागर पवार तुळजापूर शक्तीपीठाच्या दिशेने निघालाय. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अस साकडं आई तुळजाभवानीला घालण्यासाठी चालत निघाला आहे.
काळ बदलला आहे, पण आपल्या नेत्यांसाठी स्वतः सायास करून घेणारे कार्यकर्ते चाहते प्रत्येक पिढीत असतात. मोरारजी देसाई यांच्यासाठी शर्ट न घालणारे चन्नय्या स्वामी असोत किंवा अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून ऐन थंडीत तुळजापूरला चालत जाणारा सागर पवार असोत. त्यांचा भाव एकच आहे. निष्ठा तीच आहे..
सागर पवार यांचे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे. त्याने घातलेल्या साकड्याला यश मिळावे. दादा मुख्यमंत्री व्हावेत हा आई तुळजाभवानीला दंडवत..जगदंब जगदंब…!
सागर पवार मोबाइल नंबर -9819345159
9702851414, हिरेमठ स्वामी यांचे नातू गुरुराज मोबाइल नंबर -9423592751, 9834671480, आडत दुकान नंबर C -95











