भिगवण : महान्यूज लाईव्ह
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज स्वामी चिंचोली यांच्या वतीने लावलेला गावबंदी बोर्ड मंत्री छगन भुजबळ यांच्या अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणानंतर अज्ञात समाजकंटकांनी फलकावर मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोवर शाई फेकली व मनोज जरांगे पाटील यांचा फोटो फाडला.
हा फोटो समाजकंटक रात्रीच्या वेळी घेऊन गेलेले आहेत तसेच स्वामी चिंचोली गावामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची पंधरा दिवसांपूर्वी शाखा स्थापन केली, या शाखेचाही फलक समाजकंटकांनी वाकवला. त्यामुळे अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन या समाजकंटकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज स्वामी चिंचोली यांच्या वतीने करण्यात आली.
या मागणीची दखल न घेतल्यास सनदशीर मार्गाने 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्वामी चिंचोली पाटी येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन सकल मराठा समाज स्वामी चिंचोली यांच्या वतीने दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आरोपींविरुद्ध आम्ही तात्काळ कायदेशीर कार्यवाही करू, सर्वांनी शांतता बाळगावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.











