मुंबई : महान्यूज लाईव्ह
ऑनलाइन शॉपिंग जेवढं सहज सोपं, तेवढेच महागडे किंवा मोठा गंडा घालणारे ठरू लागलं आहे. नवी मुंबईतील एका महिला डॉक्टरला मात्र असाच अनुभव आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपण ह्या गोष्टी ऐकतो की, ऑनलाईन गोष्टी मागवल्यानंतर फोनच्या ऐवजी त्यामध्ये दगड येणे, साबण येणे असेही प्रकार अनेकांना अनुभवायला मिळाले आहेत. परंतु मुंबईतील एका डॉक्टरला तीनशे रुपयांच्या लिपस्टिक साठी तब्बल एक लाख रुपये गमवावे लागले आहेत.
नवी मुंबईतील या महिलेची माहिती, नाव व तपशील पोलिसांनी सांगितला नसला, तरी ऑनलाईन शॉपिंग करताना या महिलेला तब्बल एक लाख रुपये ऑनलाईन गंडा घालणाऱ्या कंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेने फेसबुकवर ऑनलाईन लिपस्टिक पाहून ऑर्डर केली. या कंपनीने या महिलेला ही लिपस्टिक डिलिव्हरी केल्याचा मेसेज पाठवला. त्यावर संबंधित महिलेने संबंधित कंपनीच्या कस्टमर केअर वरती संपर्क साधला, तेव्हा तुम्हाला ही लिपस्टिक मिळालेली आहे आणि त्याची खातरजमा करायची आहे, फक्त दोन रुपये पाठवा ही मागणी करत एक वेब लिंक पाठवली.
तिने ही वेब लिंक डाऊनलोड करताच त्यामध्ये पत्ता आणि बँक तपशील भरण्यास सांगितला. त्याप्रमाणे या महिलेने तपशील भरला यूपीआय देखील भरला आणि महिलेच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये डेबिट झाले











