सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मारुती सोनवणे यांची इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे इंदापूर शहराध्यक्ष शैलेश पवार ढवळे यांनी सोनवणे यांना नियुक्ती पत्र दिले. हे नियुक्ती पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ,अतुल झगडे,शुभम निंबाळकर उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार भरणे, प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहचवणे, सामाजिक कार्यात सहभागी होवून पक्ष वाढविण्यासाठी व मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
दादासाहेब सोनवणे हे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सामाजिक कार्यात सतत सहभागी होत जनतेला न्याय मिळवून दिला आहे. गोरगरीबांना आरोग्याच्या शिबीराच्या माध्यमातून सेवा केली आहे.











