सोमेश्वरनगर : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाघळवाडी येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमेश्वरनगर पंचक्रोशी मधील विविध गावातील तरुणांनी एकत्र येत आरंभ सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. आरंभ सामाजिक प्रतिष्ठान सोमेश्वरनगर यांच्या तर्फे दिनांक १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.श्री रामायणाचार्य गणेश महाराज कांगणे, (मोहपुरी, जालना) हे कथा प्रवक्ते असणार आहेत. १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान ७ दिवस रोज सायंकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत पंचक्रोशीमधील भजनी मंडळाचे भजन होईल. कार्यक्रमाचे ठिकाण मु.सा.काकडे कॉलेज मैदान वाघळवाडी सोमेश्वरनगर असून दररोज ७ वाजता श्रीराम कथेला सुरुवात होईल.
आरंभ प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











