संदीप मापारी पाटील, बुलढाणा
14 नोव्हेंबर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लोणार येथील भाजी मंडई परिसरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने चार दुकाने जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत लोणार शहरातील भाजी मंडई परिसरातील गोपाल किसन काळे यांच्या प्रेस दुकानाचे 80 हजार रुपयांचे, जगन्नाथ बळीराम मोरे यांच्या हेअर सलूनचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले . तर महादेव शिवाजी गवळी यांचे ओम हेअर सलून दुकानाचे एक लाख 66 हजार रुपयाचे नुकसान व शेख नवाब शेख रसूल यांच्या शाही मटन शॉप याचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी शेवाळे यांनी दिली.
रात्री 10:३० वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीची माहिती मिळताच शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी तात्काळ नगरपरिषदेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र लोणार अग्निशामक गाडीत बिघाड असल्यामुळे घटनास्थळी लवकर पोहोचू शकली नाही. त्यानंतर त्यांनी मेहकर येथील माजी उपनगराध्यक्ष जयचंद भाटिया यांच्याशी संपर्क करून मेहकर येथील अग्निशामन बोलवली.
तीस मिनिटांच्या आत नगरपरिषद मेहकर येथील अग्निशामन गाडी घटनास्थळी पोहोचली व आगीला नियंत्रणात आणण्यात आले. यावेळी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमेश मेहत्रे, गणेश लोंढे, विशाल धोंडगे, संजय जाधव ज्ञानेश्वर निकष, रतन वाणी, हरीढाकणे, घटना घटनास्थळी येऊन मदत केली.











