• Contact us
  • About us
Monday, June 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खटाव तालुक्यातील पुसेगावच्या जोतिषशास्त्र व अध्यात्मशास्त्र केंद्रावर ऐन दिवाळीत परदेशी अभ्यासकाची का गर्दी झाली?

tdadmin by tdadmin
November 14, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0
खटाव तालुक्यातील पुसेगावच्या जोतिषशास्त्र व अध्यात्मशास्त्र केंद्रावर ऐन दिवाळीत परदेशी अभ्यासकाची का गर्दी झाली?

इस्रो च्या मिशन ए मंगळ मधील प्रमुख वैज्ञानिकांची भेट!

गणेश आळंदीकर, सोमेश्वरनगर
खरे तर शास्त्र हे शास्त्र च असते मग ते रसायन शास्त्र असो कि ,जोतीष शास्त्र मध्यंतरी ईसरो चे शास्त्रज्ञ जोतीबा ला गेल्यामुळे त्यांचेवर काही नागरिकाकडुन टिका झाली. पण त्यानी देखील एका मर्यादेपर्यंत शास्त्र असते त्यापुढे अध्यात्म व ईश्वरी ताकद देखील महत्वाची असते असे सांगीतले .

असेच काहीसे पुसेगाव (ता खटाव जि सातारा) येथे दिसून आले आहे. कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता ज्योतीष शास्त्राला अध्यात्माची जोड देत सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ( ता .खटाव )चे ज्योतीष शास्त्र व अध्यात्मशास्त्रात पीएचडी करुन डॉक्टरेट मिळवणारे डॉ. प्रविणकुमार उर्फ दिपक कदम आपल्या घरीच या शास्त्राचे धडे परदेशी पाहुण्याना मोफत देत आहेत.

सर्वसामान्य नागरिकाबरोबर १७० रॉकेट व ६० सॅटेलाईट लॉंचींगच्या सहभागात मोलाचा वाटा असणारे इस्रोचे वैज्ञानीक डॉ. एस. व्ही. शर्मा यानी स्वत: पुसेगाव च्या भवानीनगर स्थित या केंद्राला भेट देऊन कदम यांच्या कार्याचे कौतुक केले आणि विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे मत डॉ शर्मा यानी यावेळी व्यक्त केले.

एकीकडे बुवा बाबाच्या नावाने समाजात अडचणीतील लोकांना लुटण्याचे काम करणा-या घटना वाढत असताना, हिंदु संस्कृतीचे संत साहीत्याचे परदेशी अभ्यासकांना मोफत ज्ञान वाटत, ज्योतिष शास्त्राचे निस्वार्थी धडे देण्याचे काम या अध्यात्म केंद्राद्वारे गेली अनेक वर्ष बिनबोभाट चालु आहे.

या केंद्राद्वारे डॉ. दिपक कदम यानी आत्तापर्यंत फ्रान्स, ईटली सारख्या देशातील नागरीकाना मोफत ज्ञानाचे वाटप केले. परिस्थितीने मध्यमवर्गीय असून सलग सात वर्ष महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवणारे प्राध्यापक दिपक कदम यानी काही वर्षांपूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन जोतीषशास्त्र व अध्यात्म शास्त्रात पीएचडी मिळवून वेगळ्या पद्धतीने समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला व स्वत:च्या निवासस्थानीच या शास्त्रांचे मोफत अभ्यास केंद्र स्थापन केले.

वैयक्तिक समस्यापेक्षा समाजहिताच्या समस्याना व त्यावरील उपायांना ते जास्त महत्व देतात. जर कुणी वैयक्तीक समस्या घेऊन या केंद्रात गेला तर त्याला अध्यात्मिक व ज्योतिष शास्त्रातील ज्ञानानुसार शास्त्रोक्त मदत केली जाते, मात्र त्याच्या इच्छेने त्याला एखाद्या सामाजिक संस्थेला मदत करा किवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याची फी भरा, अनाथाश्रमात अगदी विद्यार्थ्यांची कपडे वाटण्यापासून त्या अनाथांना अंथरुण पांघरुण पर्यंत मदत करायचा सल्ला ते देतात.

वैयक्तीक अडचणींसाठी स्वत:साठी काही न घेता व इतर संस्थाना मदत करायला ते लावतात हे विशेष.
जगद्गुरु शंकराचार्य यांचे सानिध्य लाभलेले, ब्रम्हलीन स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी गौरव केलेले डॉ. प्रविणकुमार उर्फ दिपक कदम यानी प्रसिद्धीपासून दुर राहत पुणे येथील एका मुक्त विद्यापीठाची तसेच काशी येथील विद्यापीठाची विद्या वाचस्पती ही डॉक्टरेट घेतली असताना, मोठ्या पगाराची नोकरी असताना निस्वार्थीपणे आपले समाज कार्य करीत आहेत.

याबाबत त्याना विचारले असता, मानवी जीवन ताण तणावाने युक्त असून मन:शांतीसाठी साधना गरजेची असते. दिवसभरातून किमान २० मिनीट प्रत्येकाने साधना केली पाहीजे असे ते म्हणाले. इस्रो द्वारे “मिशन ए मंगळ” मधे मोलाचे योगदान असणारे डॉ. एस. व्ही. शर्मा यानी पुसेगाव येथील या केंद्रावर भेट दिली असता, स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेमध्ये होणारे रुपांतर प्रक्रियेचे प्रात्यक्षीक कदम यांचेकडुन समजुन घेतले व अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे सांगत जिथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म सुरु होते असे ते म्हणाले.


ऐन दिवाळीत पुसेगाव ला परदेशी अभ्यासकांचे आगमन

प्राचीन संस्कृती, ज्योतिषशास्त्र व अध्यात्मशास्त्र याबाबत ऐच्छिक मदतीवर उभारलेल्या पुसेगाव येथील डॉ. दिपक कदम यांच्या या केंद्रावर इटलीतील अभ्यासकानी गर्दी केली. इटलीतून आलेल्या अभ्यासकांना भारताची कोणती गोष्ट आवडते व का आवडते? हा इंग्रजीतून प्रश्न विचारल्यावर अंड्रीया, जियाकोमो ,मार्को या तिघांनी भारतात खुप काही प्राचीन विद्या शिकण्यासारख्या असून आमच्यात या ज्ञानामुळे ताकद येते असे उत्तर त्यानी दिले .

Next Post
अपघातात जखमी झालेल्या नागरिकाच्या मदतीसाठी राजवर्धन पाटील धावले..! पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ झाला अपघात..!

अपघातात जखमी झालेल्या नागरिकाच्या मदतीसाठी राजवर्धन पाटील धावले..! पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ झाला अपघात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group