बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञात विद्या प्रतिष्ठानच्या नियमित बैठकीसाठी आले असतानाच शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

शरद पवार यांना बारामतीत बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला. काल विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
पवार यांनी शनिवारी दिवसभर बारामतीतील भेटीदरम्यान विविध ठिकाणी माहिती घेतली त्यांनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये बैठकही घेतली त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन तेथील नवीन प्रयोग यांची माहिती घेतली या ठिकाणी शरद पवार दोन ते अडीच तास होते.
त्यानंतर दुपारी दोन वाजता ते विद्या प्रदेशांच्या विश्वस्त बैठकीसाठी विद्या प्रशांमध्ये रवाना झाले विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञान सभागृहात ही विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी पवार पोचल्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे तातडीने बारामतीतीलच डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना पाचारण करण्यात आले डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला.
डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने पवार यांचा आजचा रविवारचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.











