बारामती : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसापूर्वी बारामती शहरातील जुन्या मोरगाव रोड नजीक एका अंध महिलेला चारचाकीने चिरडले. या घटनेमध्ये सदर महिलेचा मृत्यू झाला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे
बारामती शहरातील जुन्या मोरगाव रस्त्यावर ही घटना घडली. घटनेनंतर अपघात करणाऱ्या चारचाकी वाहनाखालून या महिलेला बाहेर काढण्तियात आले. यामध्ये छबाबाई शंकर गिरमे या अंध महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील वाहन व वाहनचालक निष्पन्न झाले असून आरोपीला ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.











