• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडमध्ये ओबीसी पर्व, बहुजन सर्व हा नवा पॅटर्न राबवणार! ओबीसी आरक्षणाचे संरक्षणासाठी आरपारची लढाईचा निर्धार !

tdadmin by tdadmin
November 8, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0
दौंडमध्ये ओबीसी पर्व, बहुजन सर्व हा नवा पॅटर्न राबवणार! ओबीसी आरक्षणाचे संरक्षणासाठी आरपारची लढाईचा निर्धार !

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : ओबीसी का नारा है, सो में से साठ हमारा है, ओबीसी पर्व, बहुजन पर्व अशी घोषणा देत ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाने एकत्रीत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आरपार ची लढाई लढण्याचा निर्धार चौफुला येथे पार पडलेल्या बहुजन महामेळाव्यात करण्यात आला.

दौंड तालुक्यातील चौफुला ( बोरीपार्धी ) येथे बुधवारी ( दि ८) ओबीसी,एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाचा भव्य बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमचा आतापर्यंत कोणाच्याही आरक्षणाला कधीच विरोध नाही, मात्र आमच्या आरक्षणात कोणी दबाव आणून संविधानाने दिलेले आरक्षण असंविधानिक मार्गाने घुसखोरी करून जर घेत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.

राज्य सरकारने कोणताही निर्णय कोणाच्या दबावाखाली घेऊ नये, आततायी करू नये, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करावे , अन्यथा ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आणि याची सुरुवात दौंड तालुक्यातुन होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

आमचे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही पण आमच्या हक्काच्या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करावे लागणार आहे. आमच्या आरक्षणाबद्दल असेल तर आम्ही ते रोखू. राज्य आणि केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे. अन्यथा सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील असा विचार यावेळी बोलताना अनेक व्यक्त्यांनी आपल्या भाषणात दिला.

सरसकट कुणबीचे दाखले दिले, तर भविष्यात मूळ ओबीसी समाजाचा साधा चपराशीही होणार नाही आणि कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही दिसणार नाहीत अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठा समाज हा ओबीसी कधीच नव्हता आणि पश्चिम महाराष्ट्रात तर एकही कुणबी नाही. खोटे पुरावे गोळा करून आणि खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसींच्या ताटातले आरक्षण लाटण्याचे काम सध्या चालू आहे, राज्य शासनाने आतापर्यंत नेमलेला आठ आयोगामध्ये एकही ओबीसी आणि मागासवर्गीय नाही. असा आरोप यावेळी करण्यात आला.

सरसकट कुणबी दाखल्यामुळे ओबीसींचे आरक्षण शुन्यावर आले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले ओबीसींच्या हक्काचे आरक्षण टिकवण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. दौंड तालुक्यात ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. दिवाळीच्या पाडव्याला जेजुरीच्या मल्हार मार्तंड च्या चरणी जाऊन सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामा देतील आणि पुढील पाच वर्षात ज्या ज्या आगामी निवडणुका होतील त्या निवडणुकीत फक्त ओबीसी एसटी आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवाराशिवाय इतर कोणाला ही मतदान न करण्याची शपथ घेणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

दिवाळीनंतर पन्नास हजारांच्या आसपास भव्य बहुजनांचा मोर्चा दौंड तहसीलदार आणि प्रांत कार्यालयवर काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या प्रसंगी ऍड दौलत ठोंबरे, ऍड यशवंत शिंदे, महेश भागवत , पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कापरे, बादशाहभाई शेख, शुभांगी धायगुडे, सपना माळी, गौरी पिंगळे, बाळासाहेब तोंडे पाटील ,श्रीकृष्ण मोरे, स्वप्निल भागवत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव गायकवाड, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष दत्ताभाऊ डाडर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश सांळुखे, सारिका भुजबळ, जयश्री भागवत, डी. डी. बारवकर, अनिकेत भागवत, मंगेश रायकर, संजय पवार आदींसह या मेळाव्यास दौंड तालुक्यातील ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Next Post

अजितदादा दिवाळीत भेटणार का? यंदा पवार कुटुंबाची दीपावली एकत्र होणार? दादांनी प्रकृतीबाबत काय सांगितले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group