शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मातब्बरांना धक्का बसला असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज सोमवारी शिरूर तहसील कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया सकाळी दहा वाजता सुरू झाली. आठ टेबल वर मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली.
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा व आपल्या गावचा निकाल काय? याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. त्यामुळे तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
गाव व विजयी सरपंच पदाचे उमेदवार : शिरूर ग्रामीण – शिल्पा दिलीप गायकवाड, सरदवाडी – लक्ष्मी बाळासाहेब जाधव, कर्डेलवाडी – लता गणेश कर्डिले
रांजणगाव सांडस – प्रदिपा संभाजी रणदिवे, तर्डोबाची वाडी – जगदीश भागचंद पाचर्णे, रांजणगाव गणपती – सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे, अण्णापुर – दीपिका शिंदे, वाजेवाडी – पुनम ज्ञानेश्वर चौधरी











