मुंबई : महान्यूज लाईव्ह
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवताना श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पराभूत केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघातील कोणाचेही शतक झाले नाही, परंतु 357 धावा फलंदाजाने कुटल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी त्यावर कळस चढवताना श्रीलंकेला अवघ्या 55 धावात घरी पाठवले.
विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही खेळाडूचे शतक पूर्ण न होता सर्वाधिक धावसंख्या केलेली ही इतिहासातील पहिली धावसंख्या असून यापूर्वी पाकिस्तानी इंग्लंडविरुद्ध सन 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत आठ गडी बाद 348 धावा केल्या होत्या. आज भारताने तब्बल 357 धावा करत हाही विक्रम मोडीत काढला.
विराट कोहलीने ८८, शुबमन गिलने ९२ धावा आणि श्रेयस अय्यरने केलेल्या ८२ धावांच्या जोरावर भारताने आठ गडी बाद 357 धावांची मजल मारली. त्यातही विराट व शुभमन यांची दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी प्रेक्षकांचा उत्साह वाढणारी ठरली. विशेष म्हणजे आज सर्वच फलंदाजांनी सर्वोत्तम कांबळे क्रिकेट कामगिरी केली. रवींद्र जडेजाने २४ चेंडूंत ३५ धावा केल्या.
श्रीलंकेची सुरुवात मात्र फारच अडखळत झाली कारण पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराने पहिली विकेट घेतली. मोहम्मद सिराजने काही वेळातच तीन गडी बाद केले तर व मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्याच षटकात सलग दोन गडी बात करत श्रीलंकेची अवस्था सहा गडी बाद 14 अशी करून टाकली. या धक्क्यातून श्रीलंकेचा संघ सावरलाच नाही. श्रीलंकेचे पहिले तीन फलंदाज शून्यावर बाद झाले.











