मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील मराठा आरक्षणाच्या निर्णयावर होत असलेली दिरंगाई, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार करत, सरकार अजूनही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्वच्छ असेल, तर सरकारने तातडीने विशेष आदेशाने बोलावे अशी मागणी करत आज विरोधी आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावरती या आंदोलन केले.
आज सकाळी मंत्रालयाच्या पायरीवर हे आंदोलन महाविकास आघाडीसह अजित पवार गटाच्या आमदारांसह इतरही आमदारांनी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आमदारांना ताब्यात घेतले. यावेळी विरोधी आमदारांनी हे सरकार भित्रे, पळपुटे असल्याचा आरोप केला.
खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे, श्री. नरेंद्र दराडे, श्री. विलास पोतनीस, श्री. प्रकाश फातर्पेकर, चेतन तुपे, सुनील शेळके यांच्यासह भाजपचे व शिंदे गटाचे आमदार वगळता इतर सर्व आमदार यात सहभागी झाले होते.











