• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा कोविड केअर सेंटरमधून फॅबीफ्ल्यू चोरीला जातात…!

Maha News Live by Maha News Live
September 16, 2020
in क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
1
चला, आपणही कोरोनायुक्त होऊया..

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : कोरोनाच्या काळातही औषध कंपन्यांनी गोरखधंदा केला. रेमीडीसीव्हर व टोसीमुझोलॅब सारख्या औषधांच्या किंमतींनी गगनालाही ठेंगणे केले. टोसीमुझोलॅब इंजेक्शन तर काळ्या बाजारात ७५ हजारांपर्यंत विकले गेले. गरजवंतांना अक्कल नसते म्हणतात, पण कधी खावे, किती खावे याची तरी अक्कल सुशिक्षितांना दिलेली असेलच ना?…खासगी औषध विक्रेत्यांचे सोडा, निमगावच्या कोविड सेंटरमध्ये तर फॅबीफ्ल्यूचे दोन बॉक्सच डॉक्टरने कोणतीही नोंद न करता नेले आणि एकाच कुटुंबाला दिल्याचे निर्लज्जपणे सांगितले. ९ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेची कोणीच वाच्यता केलेली नाही, मात्र अशा डॉक्टरवर कोणतीच कारवाई झालेली नाही, होणार नाही! मग सामान्यांना मास्कसाठी पोलिस का पकडतात?

निमगाव केतकीच्या कोविड केअर सेंटरमधील कोरोनाग्रस्तांसाठी आलेल्या फॅबीफ्ल्यू या गोळ्यांचे दोन बॉक्स परस्पर घेऊन जाण्याची घटना घडली. ही सरकारी चोरीच म्हणावी लागेल. मात्र या घटनेने सामान्यांचे कोणालाच देणेघेणे नाही, सरकारी डॉक्टरांमध्ये अनास्था आहे हेच दिसून आले आहे. डॉक्टर जर गोळ्या चोरून आपल्या दवाखान्यात वापरत असतील, तर इतर सरकारी साधनेही वापरत नसतील कशावरून?

सरकारी औषधे खासगी दवाखान्यात न्यायची ही कदाचित नेहमीची परंपरा असावी, मात्र फॅबीफ्ल्यू ला सध्या कोरोनाच्या काळात खूपच भाव आला आहे. या फॅबी फ्ल्यूच्या एका पाकिटाची औषध दुकानातील कमाल किंमत २ हजार ते ३ हजार रुपये आहे. त्यामुळे जेव्हा ८ पाकिटे म्हणजे पंचवीस ते तीस हजारांचा खेळ आहे अशी बाब समोर आली, तेव्हा चोरीचे भांडे फुटले.

09 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याची माहिती अशी की, निमगांव केतकीच्या ग्रामिण रूग्णालयात कोवीड केअर कक्षात दाखल असलेल्या रुग्णांसाठी फॅबी फ्ल्यू च्या ५१० गोळ्यांचा साठा शिल्लक होता. एका पट्टीत या ३४ गोळ्या असतात व त्याची बाजारातील किंमत कंपनीनुसार २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत असते, ९ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाच्या औषध भांडार विभागात ५१० गोळ्या शिल्लक होत्या. मात्र संध्याकाळी त्या शिल्लक नसल्याचे आढळून आले. संध्याकाळी एका रूग्णाला गोळ्या देण्याची वेळ आली, तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि त्यातून बाहेर आली, सरकारी अनास्थेची एक किळसवाणी कहाणी!

एका दिवसात १० पाकिटे लंपास झाल्याचे दिसल्यानंतर याची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेदरम्यान ९ सप्टेंबर रोजी सकाळी एक डॉक्टर या गोळ्यांची विचारणा करीत होते अशी माहिती आल्यानंतर एका कर्मचाऱ्याने संबंधित डॉक्टरकडे विचारणा केली, तेव्हा त्या डॉक्टरने अगोदर दोन स्ट्रीप आणल्या आहेत, नंतर दोन बॉक्स आणले आहेत अशी कबुली दिली आणि या साऱ्या स्ट्रीप माझ्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना दिल्या आहेत असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर सारी गुंतागुंत वाढली. ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेही सारे हादरले. चर्चा वाढताच संबंधित डॉक्टरने देखील एका कुटुंबाला दिलेल्या दोन पट्ट्या वगळून इतर आठ पाकिट्यांचे दोन बॉक्स दवाखान्यात परत केल्याचे समजते. ते देखील अजून अधिकृत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा!

मात्र कोरोनासारखे महाभयंकर संकट आहे, याच निमगावच्या कोविड केअर सेंटरमधून रुग्ण दगावताहेत, असे असूनही केवळ आपण जे काम करतो आहेत, त्याकडे पाहून लोक काही बोलत नाहीत याची काहीही जाणीव न ठेवता सरकारी माल आपल्या मालकीचा करण्याची ही पध्दत जी सुरू आहे, ती खरोखरच किळस आणणारी आहे.

यासंदर्भात या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिलींद खाडे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी गोळ्या परत केल्या आहेत, त्यांनी देखील कोरोनाग्रस्तांनाच देण्यासाठी त्याचा वापर केला आहे अशी स्पष्टोक्ती केली.

मात्र सरकारी नियमानुसार दवाखान्यात उपचारासाठी दाखल रुग्णाला त्या गोळ्या द्यायच्या आहेत, गरीब व गरजू रुग्णच सरकारी सेवेचा लाभ अधिक प्रमाणात घेत आहेत, कारण त्यांच्याकडे खासगी उपचारासाठी पैसे नाहीत, अशाच रुग्णांसाठी या गोळ्या वापरण्याची आवश्यकता होती. त्या तत्वाला मात्र जर डॉक्टरच हरताळ फासत असतील, तर सरकारी अनास्था चोरीच्याही पलीकडे गेली आहे असेच म्हणावे लागेल.

Next Post
नवरा – नवरी पॉझिटिव्ह येताच अख्खे सासरच झाले कोरोनाग्रस्त ; दौंड तालुक्यात कासुर्डीतील १७ जणांसह एकाच दिवसांत 30 कोरोनाग्रस्त

काळजी करू नको असं म्हणत, म्हणत ते गेले.. अन त्यांच्या हबक्याने तिनेही डोळे मिटले..

Comments 1

  1. संदीप तावरे says:
    6 years ago

    ह्या प्रकरनाला खुप चांगली वाचा फोडली आहे. असे प्रकार बहुतेक सगळीकडेच होताना दीसतात पन ते बाहेर कधीच एत नाहीत. महान्युज बद्दल अजुन आदर वाढला.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group