महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या घराबाहेरील सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलीवूडमधल्या ड्रग्जच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. “बॉलीवूडला ड्रग्जच्या मुद्द्यावरून बदनाम केले जात आहे. ” अस जया बच्चन म्हणाल्या होत्या.
जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर बॉलीवूड ते राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
ज्या लोकांनी बॉलीवूड क्षेत्रातून नाव कमवले आहे. ते आता याला गटार बोलत आहेत. मी याला अजिबात सहमत नाही. मी सरकारला अपील करते की, आम्हाला संरक्षण आणि सरकारचा पाठिंबा हवा. अस जया बच्चन म्हणाल्या.
लोक ज्या थाळीत खातात ,त्यामध्येच छेद करतात असंही जया बच्चन यांनी सांगितल होत. जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून वातावरण तापल्यामुळे त्यांच्या घराबाहेरील सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.











