दौंड : महान्यूज लाईव्ह
पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण झाले होते. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका मंचावर आले होते. अर्थात त्यानंतर पहिल्यांदाच विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 22 ऑक्टोबर रोजी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येत आहेत.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे एकाच मंचावर येत आहेत. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता शाळेच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे.











