दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या एमआयडीसीतील एस.डी.बी.कंपनीत एका २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गणेश रघुनाथ थोरवे (वय २४ रा. व्याहळी ता.वाई) हा नोकरीला होता. त्याने कंपनीतच आत्महत्या केल्याने वाईच्या एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. गणेश थोरवे हा या कंपनीत रात्रपाळीवर कामावर हजर होता.
या घटनेची माहिती वाई पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळावर दाखल झाले. तसेच व्याहळी गावातील नातेवाईकांसह मित्र आणि ग्रामस्थ कंपनीत पोचले. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. वाई पोलिसही आत्महत्येचे कारण शोधत आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीचे असंघटीत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे, वाई तालुकाध्यक्ष महेश पेटकर, सरचिटणीस अशोक देशमुख, सचिव रोहित देशमुख, चंदनशीवे हे पदाधिकाऱ्यांनी कंपनीत भेट दिली.











