• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हडपसरच्या मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती, नगरच्या सराफा बाजारात चोरी! कोतवाली पोलिसांनी नाशिकमधून दोघांना पकडले! 

tdadmin by tdadmin
October 11, 2023
in यशोगाथा, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, Featured
0
हडपसरच्या मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती, नगरच्या सराफा बाजारात चोरी! कोतवाली पोलिसांनी नाशिकमधून दोघांना पकडले! 

नगर : महान्यूज लाईव्ह 

तब्बल 12 गुन्हे दाखल असलेले आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या अनेक गुन्ह्यात मोका लागलेले आरोपी नगर जिल्ह्यात फिरत होते. या गुन्हेगारांनी सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २४ लाखांचा ऐवज या गुन्हेगारांनी चोरला, मात्र नगरच्या कोतवाली पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत या टोळीतील दोघे नाशिकमधून जेरबंद केले. 

नगर शहरातील मध्यभागी असलेल्या सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २४ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी  कोतवाली पोलिसांची तीन पथके गुन्हा घडल्यापासून सलग आठ दिवस आरोपींच्या मागावर होती. 

टोळीतील दोन आरोपी रेल्वेने प्रवास करून पळून जाण्याच्या तयारीत असताना धावत्या ट्रेनमध्ये आरोपींचा शोध घेऊन कोतवाली पोलिसांनी आरोपींना नाशिक मधून अटक केली. अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय २२ वर्षे, रा. वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय 23 वर्षे, राहणार नाशिक रोड, सिन्नर फाटा सिकलकर वस्ती) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. 

सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून काही जणांनी १ ऑक्टोबर रोजी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. जाताना सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली होती. याप्रकरणी संतोष सिताराम सहदेव ऊर्फ वर्मा (वय ५७ वर्ष, रा. गुंजाळ हॉस्पिटल, माणिक नगर ता. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तात्काळ वेगवेगळे ठिकाणी रवाना केली. सराफा बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी आरोपींनी नाशिक मधून मारुती इको कार चोरली होती. चोरीच्या कारमधून नगरमध्ये येऊन सराफा बाजारातील दुकान फोडले. 

अहमदनगर, गंगापूर, वैजापूर यामार्गे चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्हीमधून लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान येवल्यानजीक रस्त्याच्या कडेला ती मारुती इको कार (MH १५ GR १२०३) कोतवाली पोलिसांना आढळून आली. तो परिसर कोतवाली पोलिसांनी पिंजून काढला. 

 कोतवाली पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गुन्हा केलेले दोन आरोपी मुंबईकडे पळून जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून रेल्वेची माहिती काढून दोघांना नाशिक येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी इतर सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

अटक आरोपींकडून ४२.७९० ग्रॅम चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि सोने विक्रीचे ९१,००० रू रोख रक्कम असा ३,३४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास भान्सी पुढील तपास करीत आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक विश्वास भान्सी, फौजदार प्रविण पाटील, गजेंद्र इंगळे,  अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी. इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, अभय कदम, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सतिश शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Next Post
सेल्फीने घात केला… अंकिता आणि सुनील च्या संसाराची अधूरी कहाणी!

सेल्फीने घात केला... अंकिता आणि सुनील च्या संसाराची अधूरी कहाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group