बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी बारामतीतील उद्योजक व प्रसिद्ध अर्थसल्लागार सुशील सोमाणी यांची तर कार्याध्यक्षपदी जगदीश पंजाबी यांची बिनविरोध निवड झाली.
बारामतीतील व्यापारी महासंघ हा जिल्ह्यासह राज्यातही सुपरिचित आहे. येथील व्यापाराची व्याप्ती मोठी आहे. बारामती व्यापारी महासंघाच्या माध्यमातून राज्यस्तरीय निर्णय घेतले जातात. दरम्यान या महासंघाची बैठक महासंघाचे
संस्थापक नरेंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली काल आली. यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे व व्यापारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते.
या महासंघाची नवीन कार्यकारणीची निवड पुढीलप्रमाणे – संस्थापक : नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष : सुशील सोमाणी, कार्याध्यक्ष : जगदीश पंजाबी, उपाध्यक्ष : शैलेश साळुंके, उपाध्यक्ष : संतोष पानाचंद टाटिया, सचिव : स्वप्निल सुरेंद्र मुथा, सहसचिव : प्रशांत चांदगुडे, खजिनदार : शब्बीर बोहरी, सह खजिनदार : महेश ओसवाल.
कार्यकारिणी संचालकांमध्ये संभाजी किर्वे, श्याम तिवाटणे, अतुल गांधी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, सुधीर वाडेकर, पंडित भागवत यांचा समावेश असून सल्लागारपदी सुरेंद्र मुथा, फकरूद्दीन बोहरी व किशोर सराफ यांची निवड करण्यात आली आहे.











