सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांचा उद्या शनिवारी (७ ऑक्टोबर ) इंदापूर तालुक्यात झंजावती दौरा होत आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
उद्या दुपारी पावणे दोन वाजता भिगवण येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास त्या उपस्थित राहणार आहेत. मदनवाडी चौकातील व्यंकटेश लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. दुपारी पावणेतीन वाजता इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी सव्वा तीन वाजता इंदापूर कोर्टातील बार असोसिएशन कार्यालयास भेट देऊन इमारतीची पाहणी व वकिलांबरोबर चर्चा होणार आहे.
सव्वा चार वाजता नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातील मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीची पाहणी करणार असून सायंकाळी सहा वाजता इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेस भेट देणार आहेत. सायंकाळी सव्वा सात वाजता लुमेवाडी येथे होत असलेल्या उरुसाला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.











