• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

tdadmin by tdadmin
September 26, 2023
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व अहवाल सभासदांना वाटप करण्यात आली आहे. मात्र या अहवालामध्ये भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी स्वर्गीय मधुकरराव गंगाजीराव शितोळे यांचे नाव व फोटो न छापल्याने पाटस ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या अहवालावर तीव्र आक्षेप घेत या अहवलाची ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी ( दि.२५) होळी करून निषेध व्यक्त केला.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ( दिनांक- २९ सप्टेंबर २०२३ रोजी ) दुपारी एक वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेली आहे.
मात्र भीमा पाटस कारखान्याच्या सर्व साधारण सभेच्या अगोदरच भीमा पाटस कारखान्याचे संचालक मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भीमा पाटस कारखान्याच्या संचालक मंडळांनी प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवालातुन पाटसचे भूमिपुत्र दौंड तालुक्याचे भाग्य विधाते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. मधुकरराव शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वगळला आहे. भीमा पाटसच्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या या कृतीचा पाटस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निषेध सभा घेऊन व काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या वार्षिक अहवालाची होळी करून निषेध करण्यात आला.

स्वर्गीय मधुकराव शितोळे यांनी सन १९७५ ते १९८० च्या दरम्यान दौंड तालुक्याच्या पश्चिम भागापासून ते जिरायत भागासह पूर्व भागात दिवस रात्र फिरून शेतकरी वर्गाला कारखान्याचे महत्व पटवून शेतकऱ्यांचा एक-एक पैसा गोळा करून शेअर्स जमा करून कारखान्याची उभारणी केली. प्रत्येक गावातील मुलांना कारखान्यात नोकरी उपलब्ध करून दिली. यामुळे अनेकांचे संसार यातून उभे राहण्यास मोठी मदत झाली.
कारखान्याची स्थापना झाल्यापासून आज अखेर आपल्या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यामुळे बहुसंख्ये शेतकरी सभासद यांना कारखान्याचा फायदा झाला व आपल्या कुटुंबांची प्रगती करण्यात यश आले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष आमदार कुल व संचालक मंडळाला स्व.मधुकरराव शितोळे यांचा विसर पडला आहे. त्यांनी ४१ व्या वार्षिक अहवाल (सन २०२२/२०२३) सादर करत असताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. मधुकाका शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वार्षिक अहवालावर जाणीवपूर्वक छापण्यात आला नाही. हे कृत्य अतिशय निंदनीय असून हा प्रकार खोडसाळ पणाचा आहे. हे कृत्य कारखाना प्रशासनाने जाणीव पूर्वक केलेले आहे.असा आरोप पाटस ग्रामपंचायत प्रशासन व काही ग्रामस्थांनी केला.

यापूर्वी प्रत्येक वार्षिक अहवालात स्व. मधुकराव शितोळे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे.
मात्र, कारखान्यांचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व सर्व संचालक मंडळाने सन २०२२/२०२३ च्या वार्षिक अहवालामध्ये जाणीव पूर्वक कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी कै. मधुकरराव शितोळे यांना डावलले आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी प्रसिद्ध केलेला अहवाल माघारी घेवून नव्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी स्वर. मधुकरराव शितोळे यांचे नाव व छायाचित्रासह पुन्हा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा व याकृती बाबत सर्व सभासद, कामगार व ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी यावेळी केली. सरपंच रंजना पोळेकर, उपसरपंच राजवर्धन शितोळे, ग्रामपंचायत सदस्या अवंतिका शितोळे, शितल चव्हाण, सायराबानु शेख, इंदुमती शितोळे, राजू शिंदे, भूषण पानसरे, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे, संभाजी चव्हाण,शिवाजी ढमाले, धनंजय भागवत, अमोल शितोळे, संदीप पोळेकर, अभिजीत शितोळे, चंद्रकांत भागवत, सागर शितोळे आदींसह कारखान्याचे काही सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय समोर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Next Post
बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group