लोणार : महान्यूज लाईव्ह
डॉ.जा़कीर हुसेन उर्दु हायस्कूल आणि जमियते उलमाए हिंद लोणारच्या संयुक्त विद्यमाने मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ७ हजार ७८८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी ४४७ विद्यार्थी अंतिम फेरी साठी पात्र झाले होते. या प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम बक्षीस मक्का येथे उमराह यात्रा, द्वितीय बक्षीस रेफ्रिजेरेटर व तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन ठेवण्यात आले होते.
रविवारी २४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे जनरल सेक्रेटरी मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी होते, तर विशेष उपस्थिती मध्ये बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचे अतिशय मोलाचे व अभ्यासपूर्वक मार्गदर्शन लाभले. तसेच मंचावर बुलढाणा अतिरिक्त पोलीस अधिक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, लोणार पोलीस निरिक्षक निमीश मेहेत्रे सह मौलाना मो. नसरुल्लाह रहेमानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थितांचे हाजी मसूद सेठ, हाजी गफ्फार सेठ, एडवोकेट रिजवान जड्डा, रिजवान खान, वसीम खान सर, अफसर इब्राहीम खान, शेख फैसल युसुफ,रफिक सर इत्यादींनी सत्कार केले.
अशी आहेत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांची नावे
१) नशरा सिद्दीका, मो. इजहारउलहक अंजुमन स्कूल खामगाव
२).उजै़र खान अकबर खान, नॅशनल स्कूल सुलतानपूर
३). बुशरा सिद्दीका साजीदउल्लाह खान, आणि जमिला कशफ मोहम्मद इजहारुलहक, अंजुमन स्कूल खामगाव
४). उमर एकबाल हमीद खान, अली अल्लाना स्कूल मलकापूर
५). रुकय्या तस्नीम मोहम्मद मुश्ताक, न.प.शाळा नांदुरा
कार्यक्रमाचे प्रस्ताविक फहीम शेख यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्राचार्य डॉ.फिरोज खान यांनी सांभाळली तर आभार प्रदर्शन एल.सी.पी.एस चे उपप्राचार्य नबील शेख यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य रफिक शेख सह शाळेतील सर्व शिक्षकांनी व जमियतचे कार्यकर्ता आणि विदर्भ अकॅडमीचे संचालक शेख सर यांचेसह प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी करिता परिश्रम घेतले.