• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेटफळ तलावात पाणी सोडण्याच्या निर्णयावरून आमदार भरणे यांची श्रेय घेण्यासाठी धडपड पण…! आमदार कालवा समितीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते.! तो निर्णय मी करुन घेतला.. हर्षवर्धन पाटलांचा दावा

tdadmin by tdadmin
September 25, 2023
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
इंदापुरातला ‘ नाचणारा घोडा ‘ आणि ‘ रेसचा घोडा ‘ कोण ? हर्षवर्धन पाटलांवर त्यांचे चुलत बंधू प्रशांत पाटलांची जळजळीत टिका !

सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह

मी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिला व त्यामुळे शेटफळ तलावात सोमवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशा बातम्या देऊन आमदार भरणे हे शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे भरणे हे साधे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसही उपस्थित नव्हते, असा घणाघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील केला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा मुद्दा मी मांडला व तो मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला, त्यासाठी अनेक संदर्भ दिले. माझ्या आग्रही मागणीमुळे पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले असून, रविवार (दि.24) रात्री पासून हे पाणी तलावात येण्यास सुरुवात होत आहे. शेटफळ तलाव पुर्ण क्षमतेने भरून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे येथे शनिवारी ( दि. 2 सप्टेंबरला ) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा मुद्दा मी मांडला. परंतु तलावामध्ये पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची टिप्पणी होती. मात्र बैठकीमध्ये शेटफळ तलाव पाण्याने भरून घेणे गरजेचे असल्याचा माझा मुद्दा शेवटपर्यंत मी लावून धरला, त्यासाठी अनेक संदर्भ दिले. माझ्या आग्रही मागणीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीमध्ये नीरा डावा कालव्याचे चालू असलेले आवर्तन दि. 20 सप्टेंबर पर्यँत संपवून, लगेच दि. 21 पासून शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय हा कालवा सल्लागार समितीमध्ये जाहीर केला व तसे बैठकीचे इतिवृत्त निघाले. परंतु दि. 21 ला इंदापूर तालुक्यातील फाटा नं.36 व 46 आवर्तन चालू होते. त्या परिसरात पाऊस नसल्याने तेथे आवर्तनासाठी 4 दिवस जास्त देण्यात आले. त्यानंतर कालवा सल्लागार समितीतील निर्णयानुसार रविवार रात्रीपासून शेटफळ तलाव भरून घेण्यास सुरुवात होत आहे. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 640 एम.सेफ्टी. असून, तलावाला नवीन व्हॉल टाकला जाणार आहे. शेटफळ तलाव भरून घेण्यात येणार असल्यामुळे बावडा व परिसरातील 8-10 गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
शेटफळ तलाव पाणी सोडण्याच्या निर्णयाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक ही महत्त्वाची असूनही विद्यमान लोकप्रतिनिधी दि. 2 रोजीच्या सदर बैठकीला उपस्थित नव्हते. त्या बैठकीत शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय मी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करून घेतला. सध्या पाणी सोडणे हा संवेदनशील विषय असल्याने त्याचा निर्णय फक्त पालकमंत्री हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीद्वारे तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे घेऊ शकतात. असे असताना मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे शनिवारपासून प्रसारमाध्यमांना मी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिला व त्यामुळे त्यांनी शेटफळ तलावात सोमवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशा बातम्या देऊन शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधीनी असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित राहिला हवे होते, असा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांना लगावला.

Next Post
पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार "संदीप उर्फ संभाजी कदम" यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group