राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संदीप उर्फ संभाजी जगन्नाथ कदम यांचा बारामती शहरात बारामती-भिगवन रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोर शुक्रवारी (ता. 22) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या आसपास तीन चाकी टेंपोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात झाला. त्यांच्यावर मागील चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अखेर सोमवारी (दि २५) अयशस्वी झाली. बारामती येथील खासगी रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दरम्यान, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे संभाजी कदम यांच्या कुटुंब, नातेवाईक यांच्यासह यवत व पाटस पोलिस कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार संदीप उर्फ संभाजी जगन्नाथ कदम (वय- 43, रा. बारामती मुळगाव – लासुर्णे ता. इंदापुर) हे सध्या पाटस पोलीस चौकीत कार्यरत होते. संदीप कदम हे शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. बारामती-भिगवण रस्त्यावर बारामती शहरातील हॉटेल समोरीस रस्त्यावरुन संदीप कदम पायी जात असतांना, पाठीमागुन आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीन चाकी टेंपोने कदम यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात ते रस्त्याच्या एका बाजुला फेकले गेले. यात त्यांना डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने, त्यांना स्थानिक नागरीकांनी बारामती शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने, संदीप कदम यांना पुढील उपचारासाठी बारामतीहुन पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर मागील तीन दिवसापासुन संदीप कदम यांच्यावर उपचार चालु होते . त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रविवारी रात्री बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी (दि २५) उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते.
इंदापुर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवाशी असलेल्या संदीप कदम यांनी बारामती शहर, जिल्हा ( ग्रामीण ) पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा व लोणी काळभोर पोलिस ठाण्यात यापुर्वी नोकरी केलेली आहे. मागील तीन वर्षापासुन संदीप कदम हे यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलिस चौकीत हवालदार म्हणुन कार्यरत आहेत. संदीप कदम यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हे डिटेक्शन पथकात काम करीत असुन, त्यांनी आपल्या कौशल्याने, अनेक गुन्ह्याची उकल केलेली आहे. मात्र कदम यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.