• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली आणि बारामतीच्या दोन गृहस्थांची मनं ओळखणे फारच कठीण! परग्रहावरून लवकर मशीन पाठवा!

Maha News Live by Maha News Live
September 24, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0

ऑस्ट्रॉनॉमी प्रवासवर्णन – ३ : घनश्याम केळकर

भारतदेशावर लक्ष ठेऊन असलेल्या परग्रहावरून आलेल्या तबकडीने आपल्या ग्रहाला पाठविलेला आठवड्याचा वृत्तांत आमच्या हाती प्रत्येक आठवड्याला येत असतो. हाच वृत्तांत आपल्या वाचकांसाठी सादर करतो आहोत… जसा आहे तसा…..

आपल्या सूचनेनुसार दोनतीन दिवस दिल्लीवर लक्ष ठेऊन आहे. दिल्लीत मुक्कामी गृहस्थांनी देशभरातील प्रतिनिधींची सभा अचानकपणे बोलावली होती. देशभरातील राजकारणी व्यावसायिकांची हृदयाची वाढलेली धडधड आपल्या सेंन्सरव्दारे टिपली गेली आहे. हे गृहस्थ काहीही करू शकतात, त्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी हे सगळे व्यावसायिक आपपल्या कंपन्या पकडून सावधपणे या सगळ्याकडे पाहत होते.

आरक्षण हा शब्द अलिकडे महाराष्ट्रातून खुपच ऐकू येऊ लागला आहे. परंतू दिल्लीच्या हवेतही हा शब्द महिला या शब्दासोबत ऐकू येऊ लागला. सुरुवातीला या राजकारणी व्यावसायिकांची धडधड फारच वाढली होती. परंतू दिल्लीत मुक्कामी गृहस्थांनी बांधलेल्या नव्या संसदेत झालेल्या दोन चार भाषणानंतर बहुतेक जण पूर्वस्थितीवर आले असल्याचे आपल्या सेन्सरव्दारे दिसते आहे. मागे आकाशगंगेच्या मध्यवर्ती स्थानकाकडून संदेश आला होता, त्यामुळे आपण सगळेच घाबरून गेलो होतो.

तेथून एक प्रचंड ताकदीचे चुंबकीय वादळ आपल्या सुर्यमालेच्या दिशेने येत असल्याचा तो संदेश होता. त्या वादळाच्या धक्क्याने सुर्यमालेतील अनेक ग्रह त्यांच्या कक्षेतून बाहेर फेकले जातील असा इशारा या संदेशात दिला होता. ते वादळ रोखण्यासाठी आपण किती तयारी केली. या ग्रहावर असे काही संकट येत आहे हे कुणालाच माहिती नव्हते. पण आकाशगंगेचे रक्षणकर्ते म्हणून आपण मात्र या संकटाला तोंड देण्यास तयार होतो. पण प्रत्यक्षात झाले काय, तर एक उपग्रहावर काही उल्का आदळून तिथे दोनचार खड्डे पडले.

दिल्लीत मुक्कामी गृहस्थांनी केलेल्या घोषणेचे तसेच काहीतरी झाले आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार येऊ पाहणाऱ्या लोकोत्सवासाठी आपल्याला अनुकुल वादळ हे गृहस्थ निर्माण करतील अशा भीतीने त्यांचे विरोधातील लोक तयारी करू लागले होते. प्रत्यक्षात असे कसलेही वादळ निर्माण झालेले नसल्याने हे लोकही आता आपापल्या उद्योगाला लागले आहेत.

महाराष्ट्र प्रांतातून निघताना तिथेही आरक्षण, आरक्षण हा शब्द अजूनही हवेत फिरत होता. आपल्या भाषेत अशा अर्थाचा शब्दच नाही. त्यामुळे हा काय प्रकार आहे, हे तुम्हाला सांगावे यासाठी या ग्रहावर विखुरलेल्या आपल्या सगळ्या स्थानकांवरून माहिती जमा केली. परंतू तरीही फारसे काही समजू शकले नाही. काही विशिष्ठ लोकांसाठी शिक्षण घेण्यासाठी, प्रांत किंवा देश चालविणाऱ्या यंत्रणेत काम करण्यासाठी किंवा प्रांत, देशाच्या प्रतिनिधीमंडळात काही प्रमाणात जागा राखून ठेवणे याला आरक्षण म्हणतात असे साधारणपणे आम्हाला समजले आहे.

भारतात जसे आरक्षण आहे तसे इतर देशात नाही असे म्हणतात. पण अनेक देशात वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण आहे. कुठे शरीराच्या रंगावरून आहे, कुठे दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांसाठी आहे. पण भारतातील आरक्षण जातींवरुन आहे. जात हा शब्दही आपल्या शब्दकोशात नसल्याने त्याबद्दलही अधिक माहिती मिळवणे कठीण जात आहे. मात्र येथे राजकारणी व्यावसायिकांमध्ये जात आणि आरक्षण हे शब्द सतत बोलले जातात. यामुळे अनेक कंपन्यांना प्रचंड नफा झाला तर अनेक कंपन्याचे दिवाळे निघाले. त्यामुळे या दोन शब्दांना हे राजकारणी व्यावसायिक फारच घाबरून असतात असे निदर्शनास आले आहे.

सध्या महाराष्ट्र प्रांतावर एक मुख्य आणि दोन उपची सत्ता असल्याचे यापूर्वीच कळविले आहेच. या तिघांनीही सध्या आरक्षण या शब्दाचा मोठा धसका घेतला असल्याचे दिसते आहे. एकीकडे आरक्षणासाठी धरलेला उपवास त्यांनी सोडविला. पण त्यांना आता अनेक ठिकाणाहून उपवास सोडविण्यासाठी निमंत्रणे येत आहेत. पण पहिला उपवास सोडविताना जे वचन दिले, ते दुसरेकडे जाऊन तोडावे लागेल आणि दुसरे वचन द्यावे लागेल. यामुळे हे तिघेही सध्या त्रस्त आहेत. मुळातच आपल्या ग्रहावर आरक्षण आणि जात नाही, त्यामुळे आरक्षण हा इतका महत्वाचा प्रश्न का आहे आणि त्यामुळे इथले वातावरण ऐवढे का बिघडते हे समजत नाही.

येथील हवेत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, अमुक आरक्षण, तमुक आरक्षण हे शब्द सतत फिरत असलेले आपल्या रेकॉर्डरने नोंदविले आहे. पण अचानक अतिशय दबक्या आवाजात मुस्लीम आरक्षण हा शब्दही नोंदला गेला. या शब्दाचा मागोवा घेतला असता मोठे आश्चर्याचे वर्तमान हाती लागले. मुख्य आणि दोन उपपैकी दुसऱ्या उपंच्या बैठकीत हा शब्द बोलला गेला आहे.

पहिले उप ( पण खरे मुख्य ) यांनीच हा शब्द न बोलण्याची ताकीद दिली होती. असे असताना दुसऱ्या उपनी या शब्दाचा उच्चार का केला याबाबत सध्या दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मुस्लीम आरक्षण हा शब्द फार मोठ्या आवाजात ऐकू येईल असे वाटत नाही. काही दालनातूनच तो ऐकू येईल. पण तो असाच काही काळ ऐकू येऊ लागला तर या प्रांतीच्या राजकारणी व्यावसायिकांमध्ये आणखी एक खळबळ निर्माण होईल अशा शंका व्यक्त होत आहेत.

दुसरे उप पहिल्या ठिकाणी अस्वस्थ होते म्हणून इथे आले. पण हा इथे बंदी असलेला शब्द जर ते वारंवार उच्चारत असतील तर ते इथेही स्वस्थ राहू शकणार नाहीत. हे दुसरे उप पुन्हा पहिल्या जागी जाण्याची तयारी तर करत नाहीत ना याची चर्चा पुढील आठवड्यात सुरु होईल. मुख्य राहतील की जातील यावरच्या चर्चा अजून सुरु असतानाच आता या नवीन चर्चेने पहिले उप, त्यांचे वरिष्ठ असलेले दिल्लीत मुक्कामी गृहस्थ आणि त्यांचे नं. २ यांच्या डोक्याला आणखी भुंगा लागणार असे दिसते आहे.

आपल्या ग्रहावर जन्मास आलेल्या प्रत्येकास उत्तम दर्जाचे आणि त्याला आवडेल ते शिक्षण दिले जाते. त्यानंतर प्रत्येकाला आवडेल ते काम करण्यास तो स्वतंत्र असतो. आपल्या ग्रहावर राज्यव्यवस्था चालवणे आणि इतर कोणताही व्यवसाय करणे याला तितकेच महत्व आहे. पण या ग्रहावर आणि विशेषत: भारतदेशी तसे नसावे असे वाटते. शिकण्याच्या आणि नोकरीच्या संधी कमी आहेत आणि त्यासाठी खुपजण वाट पहात आहेत, त्यामुळे आरक्षण या शब्दाला महत्व प्रात्प झाले आहे असे वाटते आहे. याबाबत अधिक माहिती घ्यावी लागेल.

भारतदेशी सरकारी नोकर नावाचा प्रकार आहे. शब्द नोकर असला, तरी तो प्रत्यक्षात मालक आहे असे काही जाणकार म्हणत असल्याचे आपल्या रेकॉर्डवर आहे. या सरकारी नोकरांना लक्ष्मीदर्शनही खुप होते असे म्हणतात. या लक्ष्मीदर्शनाच्या ओढीनेच सरकारी नोकरीत जावे असे बहुतेक सगळ्या तरुणांना वाटते. यामुळेच येथेही आरक्षण या शब्दाला महत्व प्राप्त झाले आहे.

दिल्लीत मुक्कामी गृहस्थांनी महिलांना आरक्षण देणार असे सांगितले पण ते आरक्षण मिळण्यासाठी असलेल्या अटी पाहता या ग्रहावरील गणनेनुसार १० वर्षे वेळ लागू शकेल असे म्हणले जात आहे. काही प्रांतांचा लोकोस्तव काही महिन्याने होणार आहे आणि त्यानंतर लगेचच देशाचा लोकोस्तव आहे. या लोकोस्तवासाठीच या गृहस्थांनी हे सांगितले असल्याचे बरेचजण बोलत आहेत. परंतू अजूनही या गृहस्थांकडे या लोकोस्तवासाठी पुरेशी पुंजी जमलेली नाही, असे याच गृहस्थांच्या राजकारणी कंपनीतील लोकच बोलत आहेत. त्यामुळे आणखी पुंजी मिळविण्यासाठी हे गृहस्थ आणखी काहीतरी करतील असे बोलले जात आहे.

भारतदेशी पर्जन्यमान बरे आहे, पण महाराष्ट्र प्रांती मात्र काही उपप्रांत अजूनही कोरडे आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा नामक उपप्रांतांत अजूनही पर्जन्यमान खुपच कमी आहे. यातील मराठवाडा प्रांती स्वत:चा जीव संपविण्याचं आश्चर्यकारक प्रकार बरेच वर्षापासून सुरु आहे. सध्याच्या दुष्काळाच्या धसक्यानेही अशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे कळाले आहे.

मागेच आपल्याला कळविल्याप्रमाणे दिल्ली मुक्कामी गृहस्थांच्या मनात काय चालले आहे हे कळण्यासाठी प्रभावी यंत्र पाठवावे. आता उपलब्ध असलेल्या यंत्रांनी बाकी सगळ्या माणसांच्या मनातले कळू शकते पण फक्त दोन माणसांचे मन ओळखता येत नाही. एक हे दिल्लीत मुक्कामी असलेले गृहस्थ आणि दुसरे महाराष्ट्र प्रांती बारामतीचे गृहस्थ. पुढील काळात यांचे मन ओळखणे फारच गरजेचे पडेल, त्यामुळे मागणी केल्याप्रमाणे यंत्र तातडीने पाठवावे ही विनंती.
या ग्रहावर ताबा मिळविण्यासाठी आपली ही सगळी मोहीम आहे याची आम्हास कल्पना आहे. यासाठीच सर्व माहिती जमा होते आहे. आम्ही यासाठीच प्रयत्नांची शर्थ करत आहोत. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात पाठवित आहोत.

वाचकहो, पुढच्या आठ दिवसात परग्रहावरील जीव आपली पृथ्वी ताब्यात घेण्यासाठी करत असलेली कारस्थाने कदाचित उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढील ऑस्टॉनॉमीचे प्रवासवर्णन जरूर वाचा. याअगोदरची ऑस्टॉनॉमी प्रवासवर्णने वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर जावे. https://mahanews.live/47422/ आणि https://mahanews.live/47313/

Next Post

पाटस चौकीत हवालदार असलेल्या इंदापूरच्या डॅशिंग संभाजी कदमांना बारामतीत नेमकी धडक कोणी दिली?  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group