• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघाची शिकार? मुंबई पोलिसांनी तीन जणांना केली अटक!

Maha News Live by Maha News Live
September 19, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघ नखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तीन जणांना सापळा रचून बोरीवली व मुंबई पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून दहा लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुददे्माल हस्तगत केला आहे.

या घटनेत तिघांवर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30 रा. बिरवाडी ता. महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35 रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) व मंजुर मुस्तफा मानकर (वय 36 रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

या तिघांवर भादवि 9, 39 चा 3, 44, 48 अ, 49 ब, 51 वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहीती अशी, गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहीती मिळाली की, महाबळेश्वर येथील काही लोक राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाच्या कातडयाची व त्याच्या वाघ नखांची तस्करी करण्यासाठी एल आय सी मैदान बोरीवली पश्चिम येथे येणार आहेत.

बोंबे यांनी ही माहीती आपले वरीष्ठ अधिकारी पोलीस निरिक्षक सचिन शिंदे व पोलीस निरीक्षक कुडाळकर यांना दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ही माहीती पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल यांना दिली. पोलिस उपायुक्त बन्सल यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. वरीष्ठांकडुन आदेश मिळताच वरीष्ठ पोलिस निरीक्षक कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचला.

वाघाचे कातडे व नखे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना या पथकाने शिताफीने जेरबंद केले. या तीन आरोपींकडून वाघाचे सोलुन काढलेले काळया पिवळया रंगाचे पट्टे असलेले 114 सेंटीमीटर लांब व 108 सेंटीमीटर रूंद वाघाचे कातडे, त्या सोबत 12 वाघनखे असा साधारण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये एम एच बी कॉलनी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, फौजदार अखिलेश बोंबे, हवालदार प्रविण जोपळे, संदीप परीट, प्रशांत हुबळे व गणेश शेरमळे यांनी ही कारवाई केली.

महाबळेश्वरच्या जंगलात मोठया प्रमाणावर बिबटे आहेत,  परंतु पट्टेरी वाघ दिसत नाही. वन विभागाचे अधिकारी देखील आपल्या जंगलात पट्टेरी वाघ नाहीत असे सांगतात, परंतु या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत हे सिध्द होत आहेत. या पुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाच्या शिवारात ब्लॅक पॅथर काही लोकांनी पाहीला होता, परंतु त्या नंतर तो पॅंथर देखिल पुन्हा दिसला नाही.

Next Post

मुर्ख, एक मार्क घालविला...थोडी अक्कल वापरली नाही? हे काय, २० पैकी फक्त १९?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group