• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुर्ख, एक मार्क घालविला…थोडी अक्कल वापरली नाही? हे काय, २० पैकी फक्त १९?

Maha News Live by Maha News Live
September 20, 2023
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

लक्ष्मण जगताप, बारामती 

एक मार्क घालविला. तुला  कळत नाही का? जराशा त्रासिक चेहऱ्याने आई मुलीला ओरडत होती. जाताना त्या मायलेकी माझ्याजवळून गेल्याने आईचे ते ओरडणे माझ्या कानावर पडले. मला क्षणभर वाटले, आपण त्यांच्याशी बोलावे. परंतु त्या चिडलेल्या आईला पाहून माझा विचार बदलला. नकळत मी ही मार्कांच्या विचारात गर्क झालो. एका एका मार्कांसाठी पालक मुलांना रागवितात. त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवतात.

मुलगी होती दुसरीची. परीक्षा होती वीस गुणांची. त्या मुलीने वीसपैकी एकोणवीस गुण मिळविलेले. फक्त एक गुण घालविला म्हणून दुःख किंवा त्रागा करण्यापेक्षा तिने मिळवलेल्या गुणांचे कौतुक करुन खरं तर तिला आनंद देणे गरजेचे होते.  एक गुण घालविला म्हणून तिला आपल्या आईचा ओरडा खावा लागला याचे  वाईटही वाटले. 

शंभर मार्कांच्या असणाऱ्या परीक्षांच्या बाबतीतही असेच घडते. मुलांनी त्यांची पूर्ण क्षमता वापरुनही अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत किंवा एखादा मार्क गेला तरी मुलांना पालकांची खूप बोलणी ऐकून घ्यावी लागतात.

लहानपणापासून आपण मुलांना मार्कांच्या स्पर्धेत धावायला लावतो. समाजातील एक स्टेटस सिम्बाॕल म्हणून आपण मार्कांकडे बघतो.त्यावर आपली समाजातील पत आणि प्रतिष्ठा ठरत असते. त्यासाठी मुलांना मार्कांच्या शर्यतीत धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. फक्त मार्क आणि मार्क करुन आपण मुलांना किती ताण देत आहोत याचाही विचार केला पाहिजे. परीक्षेत अनावधानाने, उत्तर येत नसेल म्हणून एखादा मार्क गेला असेल तर पालक म्हणून आपण पाल्याला समजून घेतले पाहिजे. 

अरे तु छान मार्क मिळविलेत. तुझे खूप  अभिनंदन! असाच प्रयत्न करत रहा. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत असे बोलून त्याला प्रेरित करणे  पालक म्हणून आपली जबाबदारी  आहे. एका मार्कासाठी मुलांना रागावून आपण मिळालेल्या यशावर विरजण घालतो आणि आनंद गमावून बसतो.

आज सगळं शिक्षण परीक्षा आणि मार्क यात अडकून पडले आहे. फक्त मार्कांची मोजपट्टी लावून मुलांची गुणवत्ता मोजू नये. मार्क म्हणजे फक्त एक संख्या आहे. मार्कांच्या पलीकडेही  खूप काही आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाषण संभाषण, गायन वादन, चित्र, कथन, हस्त, खेळ इ. अनेक कौशल्ये आणि आज सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाल्याचे व्यवहारज्ञान विकसित होणे ही काळाची गरज बनली  आहे. शिक्षणातून जीवनकौशल्ये विकसित होणे म्हणजे खरं शिक्षण. मुलांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

मार्क मार्क करुन मुलांची इतर कौशल्ये आपण मारुन टाकतो. मार्कांच्या शर्यतीत त्याकडे दुर्लक्ष होते. शंभर मार्क आहेत, परंतु निर्णयक्षमता नसेल तर काय उपयोग ? शाळेतील परीक्षेत कमी मार्क असणारे नव्हेत तर नापास झालेले सुद्धा जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झालेत. अशी कितीतरी माणसे आहेत.

ज्यांनी  मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याला आकार दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपले आयुष्य घडविले. आपल्या अंगी असणाऱ्या मुलभूत कौशल्यांच्या बळावर   उत्तुंग यश मिळवले आहे. त्यामुळे मार्कांत अडकून पडण्यापेक्षा मुलांना एक चांगला परिपूर्ण आणि संवेदनशील माणूस बनविण्यासाठी प्रयत्न करुयात हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट होय. ( लेखक बारामती येथील शाळेत शिक्षक आहेत.)

Next Post

राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्यात देशद्रोही झाकीर नाईक ने 191 कोटी रुपये दिले? विखे पाटलांनी नाकारलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group