दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतित पावन विद्या मंदिर शाळेच्या स्वागत कमानीची डागडुजी पंधरा वर्षांपूर्वी येथे शिकून बाहेर पडलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली त्यांनी केलेला हजार रुपयांचा खर्च शाळेच्या दृष्टीने देखील मोलाचा ठरला.
सन २००६-०७ या काळात शिक्षण घेवुन बाहेर पडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हजारो रुपयांच्या स्वखर्चातून शाळेच्या वैभवात भर टाकली, ती नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत सेवानिवृत्त शिक्षक पंढरीनाथ घोरपडे यांनी व्यक्त केले.
पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे येथे १५ वर्षापूर्वी शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.१० सप्टेंबर रोजी) स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्याच्या निमित्ताने प्रवेशद्वारावरील कमानीची झालेली दुरावस्था बदलण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरवले त्यासाठी आपापसात त्यांनी रक्कम गोळा केली. कमानीच्या कामाला जलद गतीने सुरवात करुन त्याचे काम करुन दाखविले.त्याचे उदघाटन शिक्षक पंढरीनाथ घोरपडे, वसंतराव गाडे, वसंतराव जाधव, नंदकुमार सावंत, अशोक नांगरे, दिपक सपकाळ, प्रकाश झांझुर्णे, सचिन जाधव, श्रीमती मंगल जाधव, पुष्पा लोखंडे, सतीश पाटील, मुख्याध्यापीका यादव, सुनील फरांदे, एस.बी.आत्तार यांच्या उपस्थितीत केले.
या स्नेहमेळाव्यात प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करुन प्रार्थना, स्वागतगीताने सुरुवात करण्यात आली. सुरवातीला दिवंगत शिक्षिका निकम मॅडम, तसेच विद्यार्थ्यामधील दिवंगत निलेश फरांदे, गणेश गुजले, रुपाली फरांदे, मीनाज अत्तार, संदीप ढवळे, बाबासाहेब माटे यांना श्रद्धांजली वाहिली. या स्नेहमेळाव्यास ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी आपली नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, शेती आदी उद्योगधंद्यात प्रामाणिक व चिकाटीने काम करीत आहेत असे सांगून प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी सर्व शिक्षकांचा सन्मान शिवचरित्र देऊन करण्यात आला. मनोगतामध्ये या माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या अध्यापनाची आठवण काढली.
शाळेत असताना शाळेचे महत्व वाटत नाही, पण आज आम्हाला खूप शाळेत यावेसे वाटते, मजा करावीशी वाटते, आम्ही कितीही मोठे झालो तरी विद्यार्थीच आहोत. गुरुविना ज्ञान तोडकेच आहे, आम्ही शाळेला व गुरूंना कधीही विसरू शकत नाही. आमच्या यशाचे मानकरी आमचे गुरूच आहेत. गुरूंचे ऋण हे कधीच फिटत नसते अशा भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांचा कंठ दाटून आला.
या वेळी पंढरीनाथ घोरपडे, मंगला जाधव, वसंतराव गाडे, शिवाजी जाधव, नंदकुमार सावंत,पुष्पा लोखंडे, अशोक नांगरे, दिपक संकपाळ, सतीश पाटील, प्रकाश झांजूर्णे, सचिन जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम, सुनील फरांदे, एस. बी. अत्तार यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रजित पिसाळ, सोमनाथ कारंडे, अजित चव्हान, प्रतीक जाधव, हर्षद पिसाळ, प्रसाद जायकर, श्रीधर गोरे, गौरव सोनावणे, राहुल सोनावणे, संग्राम मोहिते, अमित पिसाळ, अरिफ शेख, स्वप्नील मांढरे, बसवराज मेहत्रे, नितीन कदम, वर्षा जगताप, श्वेता दाबोले, अनुराधा जंगम आदींनी नियोजन केले. शर्मिला भिसे, विवेक फरांदे, अक्षय दीक्षित यांनी सूत्रसंचालन आणि आभार विवेक फरांदे यांनी मानले.











