• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गेल्या ३५ वर्षांपासून वाघळवाडी आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध! संभाजी होळकर यांचा सत्कार सोहळा!

Maha News Live by Maha News Live
September 18, 2023
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, Featured
0

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : वाघळवाडी ग्रामस्थांच्या वतीने बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी उत्तम धुमाळ यांची तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ३३५० उच्चांकी दर दिल्याबद्दल वाघळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उद्योजक आर एन शिंदे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषी गायकवाड, लक्ष्मण गोफणे व संचालक, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे, वाघळवाडी गावचे सरपंच, उपसरपंच गणेश जाधव, तुषार सकुंडे, निशा सावंत, आनंदराव सावंत, गुलाब गायकवाड, विकास सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत होते.

यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी बोलताना सांगितले की, सन १९८९ साली मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तेव्हापासून म्हणजे गेल्या ३५ वर्षांपासून वाघळवाडी आणि माझा त्या ठिकाणी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये काम केले, आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच कारखान्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा नंबर लागतो. ऊसदराच्या बाबतीत किंवा पहिल्या हप्त्याच्या बाबतीत असेल, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हाच पहिल्यांदा उसाची कोंडी त्या ठिकाणी फोडत असतो. अत्यंत सुस्थितीत कारखाना असल्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चांगला ऊसदर देत असल्याचे होळकर म्हणाले.

पुढे बोलताना संभाजी होळकर म्हणाले, माळेगावच्या परिसरामध्ये आपल्याला सगळ्यांना वाटायचं की, त्या ठिकाणी कारखान्याचे शैक्षणिक संकुल आहे आणि आपल्यालाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं अभियांत्रिकीच शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून आपली तळमळ होती, मात्र आपल्या कारखान्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केली. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवून एक आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार झाला. कारखान्याचे शैक्षणिक संकुल सुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते आज आपल्या कारखान्याने फार मोठ्या प्रकारचं त्याच्यामध्ये योगदान दिलेल आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शैक्षणिक संकुल असल्यामुळे आपली प्रगती झाली आणि ह्या परिसराचा आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. मग पक्षाच्या माध्यमातून जे काही संघटनेचे काम असेल, वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भातलं काम असेल, आपल्या जनतेची त्या संदर्भातली काम असतील विकासाची काम असतील, ज्या सूचना असतील त्या उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो.

गेल्या आठवड्यामध्ये जवळपास बारामती तालुक्याचे २०० कोटीचा विकास निधी उपलब्ध झाला, तो केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मिळाला. आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, आपल्या अजून विकासकामांना त्या ठिकाणी गती मिळाले पाहिजे, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित या सरकारमध्ये सामील होऊन खऱ्या अर्थाने आपल्या जनतेचे अडचणी सोडवल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाच्या मुद्द्यावर ह्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत.आणि म्हणून त्याचा फायदा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला मिळतो. सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली काम होत आहेत. मध्यंतरी एक वर्ष गेलं, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की, आपली जी काम होती. त्याच्यामध्ये कसा खंड त्याठिकाणी पडला होता असे संभाजी होळकर म्हणाले. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने विजय सावंत व सतीश सकुंडे यांनी आभार मानले.

Next Post

बारामतीतलं काशाच्या भांड्याचं 200 कोटींचं फसवणूक प्रकरण! आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group