राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील अकोले येथील भामटा शिक्षक दादासाहेब दराडे व त्याची बहीण शैलजा दराडे हिच्यासह दादासाहेब याचा मुलगा वीरधवल दराडे या तिघांवर नोकरीला लावतो, म्हणून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हडपसर पाठोपाठ दौंड येथे भामट्या दराडे कुटुंबावर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुनील ज्ञानदेव शिंदे राहणार पंचवटी अपार्टमेंट रेल्वे शाळेजवळ दौंड तालुका दौंड यांनी या संदर्भात दिली व पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे शेलजा रामचंद्र दराडे व वीरधवलदार साहेब दराडे राहणार अकोले तालुका इंदापूर जिल्हा पुणे या तिघांवर दहा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सुनील शिंदे हे दौंड मध्ये राहत असून त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीस आहेत त्यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील अकोले असून दादासाहेब व शैलजा दराडे हे दोघेही याच गावचे मूळ रहिवासी आहेत ओळख असल्याकारणाने सुनील शिंदे व दादासाहेब दराडे या दोघांचे नेहमी बोलणे होत असे.
गावातील रहिवासी असल्याने दादासाहेब रामचंद्र दराडे, शैलेजा रामचंद्र दराडे यांच्याशी संबंध येत होता. दादासाहेब रामचंद्र दराडे हा शिक्षक झाला. व त्यांची बहीन शैलेजा रामचंद्र दराडे या शिक्षण विभागात उपआयुक्त झाल्या. वेळी शिंदे सुध्दा सुध्दा नोकरीच्या शोधात होते. परंतु खुप प्रयत्न करून देखील नोकरी मिळाली नाही, म्हणून शिंदे काही काळ चाकण ऑईल मिल, कुरकुंभ, त्यानंतर शिप्ला कंपनी येथे नोकरी केली.
नंतर त्यांनी स्वतः चा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत असताना दादासाहेब रामचंद्र दराडे एकाच गावातील असल्यामुळे नोकरीवरून खुपवेळा चर्चा व्हायची. तुझे शिक्षण चांगले झाले आहे, तु असा प्रयत्न करत राहशील तरं तु कधीच यशस्वी होणार नाही असे दादासाहेब रामचंद्र दराडे याने संगितले. 25 ते 30 लाख रूपये खर्च करण्याची तयारी ठेव, तुझे शिक्षण चांगले आहे त्यात तु अनुसुचित जातीचा विद्यार्थी आहेस मी व माझी बहिण शैलेजा रामचंद्र दराडे मिळुन तुला चांगल्या हुद्दयावर कामाला लावू.
शिंदे यांनी त्यांना 25 ते 30 लाख रुपये इतकी मोठी रक्कम जमा करणे मला कठीण होईल असे सांगितले, त्यावर एकदाच खर्च कर, बाकी नंतर सर्व परिवार सुखी होईल असे सांगितले. त्यांनंतर दादासाहेब दराडे 27 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे येथे शैलेजा रामचंद्र दराडे हिच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला व शैलेजा रामचंद्र दराडे हिला सांगितले की, सुनिल चांगल्या नोकरीच्या शोधात आहे तरी तो आपल्या गावातला असल्या कारणामुळे त्याला क्लास वनच्या जागेवर कामाला लावू. तुम्ही शिक्षण मंडळात उपआयुक्त आहात, तुमच्यासाठी हा मोठा विषय नाही. त्यावर शैलेजा रामचंद्र दराडे हिने शिक्षण विचारले. 30 लाखांची तयारी ठेव, 6 महिन्याच्या आत तुझी क्लासवन म्हणुन नियुक्ती करते असे सांगितले.
दादासाहेब दराडे याने एक पत्र व्हॉटसअपद्वारे पाठविले. शैलेजा रामचंद्र दराडे शिक्षण विभागात उपआयुक्त असल्यामुळे व सारे गावकरी असल्याने नोकरीच्या आशेपोटी शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. शैलेजा रामचंद्र दराडे हिने दादासाहेब रामचंद्र दराडेकडे टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सागितले. त्यामुळे शिंदे यांनी 10 वी पासून ते बी.कॉम पर्यंतचे सर्व कागदपत्रे व दादासाहेब रामचंद्र दराडे याला 5 लाख रूपयांचा व 4 लाख 95 हजार रुपयांचा चेक व 5 हजार रूपये रोख असे एकूण 10 लाख रूपये दिले.
हे 10 लाख रूपये दादासाहेब रामचंद्र दराडे याने अॅक्सीस बँक दौंड या शाखेतून काढले. त्या वेळी विरधवल दादासाहेब दराडे हा व दादासाहेब दोघे पैसे घेऊन गेले. त्यानंतर शैलेजा रामचंद्र दराडे व दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी पुढील रक्कमेची तयारी ठेव, तुझे काम चालु आहे असे सांगितले. 24/08/2022 रोजी वीरधवल दादासाहेब दराडे आला व म्हणाला माझ्या वडीलांनी व आत्यांनी शैलेजा रामचंद्र दराडे यांनी तुमच्या क्लास 1 नोकरीसाठी जबरदस्त बंदोबस्त केला आहे व त्याने त्याच्या वडीलांशी फोनवर बोलणे करून दिले.
त्या वेळी शैलेजा रामचंद्र दराडे व दादासाहेब रामचंद्र दराडे हे सोबतच होते. त्यांनी शिंदे यांना विरधवल दादासाहेब दराडेच्या खात्यावर पैसे टाकण्यास सांगितले, त्यावेळेस पैश्याची तयारी नसल्यामुळे शिंदे यांनी मित्र नवनाथ चव्हाण, (रा.गार, ता. दौंड) यांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितली व बोलवल्याप्रमाणे दि. 27/08/2022 रोजी नवनाथ चव्हाण यांनी विरधवल दराडे यांच्या गुगल पे वर 97 हजार 199 रूपये पाठविले.
त्यानंतर दादासाहेब रामचंद्र दराडे यांना फोन करून सांगितले असता त्यांनी सागितले की मी व माझी बहिण तुमच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तुम्ही आम्हाला फोन करू नका. तुम्ही माझ्या मुलाच्या संपर्कात रहा असे सांगितले. 06 सप्टेंबर 2022 रोजी विरधवल दराडेच्या गुगल पे वर 49 हजार रूपये पाठविले त्यानंतर 17 सप्टेंबर 2022 रोजी 98 हजार रुपये पाठविले. विरधवल दराडे हा सुध्दा आम्हाला वेळोवेळी सांगत गेला की तुम्ही काळजी करू नका, माझ्या वडीलांनी व आत्यांनी (शैलेजा रामचंद्र दराडे आत्तापर्यंत भरपुर लोकांना कामाला लावले आहे. तुम्ही फक्त पैशाची तरतुद लवकर करा, नंतर 17 सप्टेंबर 2022 रोजी वीरधवल दराडे याच्या बँक ऑफ बडोदा बारामती अकाऊंट नं 08810100014004 या खात्यावर 4 लाख रूपये आरटीजीएस केले, त्यानंतर दादासाहेब दराडे याने पुणे येथे बोलावले.
15 नोव्हेंबर 2022 रोजी विरधवल दादासाहेब दराडे व त्याचे वडील दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी शिंदे यांना अकोले येथे 5 लाख रूपये रोख घेऊन बोलावले. एका अधिकाऱ्याला तातडीने द्यायचे होते, म्हणून 5 लाख रूपये रोख दिले, त्यानंतर डिसेंबर महिन्यात 2 वेळा 4 लाख 50 हजार रू व 4 लाख 50 हजार असे एकूण 9 लाख रूपये दिले.
त्यानंतर शिक्षकाची ऑर्डर मात्र आज उद्या, आज उद्या करत राहिल्याने मिळालीच नाही. अखेर शैलजा दराडे व दादासाहेब दराडे या दोघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने शिंदे यांना धक्का बसला. तेव्हापासून त्यांचा फोन बंद असल्याने शिंदे यांनी अखेर दौंड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वरील तिघांविरोधात तीस लाख रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दौंडचे फौजदार आबनावे करत आहेत.











