संयुक्त राष्ट्रसंघातील महिलांविषयक आयोगाचे भारताला सदस्यपद
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परीषदेशी निगडीत आयोगाच्या महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड झाली. यानिमित्ताने चीनचा विरोध डावलून भारला इकोसोक या प्रतिष्ठीत ठिकाणी जागा मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरूमुर्ती यांनी याची माहिती दिली.
विशेष म्हणजे या सदस्यपदावर चीनचा डोळा होता. चीन व अफगाणिस्ताननेही ही निवडणूक लढवली. मात्र भारत व अफगाणिस्तानने ही निवडणूक जिंकली.चीनला ५४ सदस्यांपैकी निम्म्या मताचांही टप्पा गाठता आला नाही. चीनसाठी हा मोठा झटका असून कोरोनाच्या बाबतीत जगाला माहिती न देऊन जगाला संकटाच्या खाईत टाकणारा चीन आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडत चालल्याचेही हे निदर्शक मानले जात आहे. आता भारत या आयोगावर पुढील चार वर्षे सदस्य असणार आहे.










