बारामती : महान्यूज लाईव्ह
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, शारदा महिला संघ व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष व राष्ट्रीय पोषण मासानिमित्त पोषण थाळी स्पर्धेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्रात रविवारी, 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये भरडधान्यापासून तयार केलेली थाळी स्पर्धेसाठी सजवून आणायची आहे. भरडधान्यामध्ये (श्री अन्न) ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, सावा, राळे, कोद्रा, कणगी, बर्टी इत्यादी पासून बनवलेले अन्नपदार्थ घरून बनवून आणून थाळी स्पर्धेमध्ये ठेवायचे आहे. यामध्ये बनवलेली पदार्थाची चव व त्याचा स्वाद आणि त्याचे आहारातील महत्त्व, माहिती व सजावट च्या माहितीच्या आधारे स्पर्धेतील तीन विजेते ठरवले जाणार आहेत.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या थाळी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी 8275573212 या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेसाठी नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.











