बारामती : महान्यूज लाईव्ह

भिगवण रस्त्यावरील एमईएस हायस्कुलची विजयनगर कॉलनीच्या बाजूची सीमा भिंत जागेवरून हलली असून धोकादायक स्थितीत आहे. या सीमाभिंतीच्या जवळून शाळेतील विद्यार्थ्यांची सततची वर्दळ असते. वेळीच लक्ष न दिल्यास येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमईएस हायस्कूलचे प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.











