रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचा पुढाकार..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधू वासवानी मिशन संचलित के.के.आय.इन्स्टिट्यूट इनल़ँक बुधरानी हॉस्पिटल पुणे तसेच खोपोली येथील सुप्रसिद्ध माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
हे तपासणी शिबिर काल रविवारी (दि.10) कासारपट्टा येथील नामदेव मंदिरात करण्यात आले. रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन इंदापूर च्या माध्यमातून ॲड. राकेश शुक्ल आणि अजय ग्रुप इंदापूर यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील आणि अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांनी केले. यावेळी बोलताना पद्मा भोसले म्हणाल्या, समाजात आरोग्यविषयक कार्यक्रम घेतले पाहिजेत, समाजाला यांची गरज आहे.समाजकार्याचा वसा समाज घटकांनी उचलला पाहिजे असे सांगत भोसले यांनी कै. रमेश शुक्ल आणि माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजवर्धन पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध कार्यक्रमा विषयीची माहिती दिली. तसेच या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. इनामदार यांनी रमेश शुक्ल यांची राजकीय कारकीर्द मला अवगत होतीच, त्याप्रमाणेच त्यांची मुलेही समाजकार्यात आपला ठसा उमटवत आहेत असे मत व्यक्त केले. कैलास कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.राकेश शुक्ल यांनी केले. सचिन शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमित दुबे यांनी आभार मानले. अजय ग्रुपचे अमित सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी, राहुल सावंत, ॲड. सोहम घोडके, गोविंद बांबळे, विनोद शुक्ल, अक्षय क्षीरसागर, विनोद शिंदे, मोहन शुक्ल, आनंद शुक्ल ,यश जाधव, , प्रितेश जाधव, हैदर शेख, उंबरे, ओंकार जामदार, कृष्णा सुतार, प्रसाद माने, सचिन शिरसागर, अमित दुबे, विशाल शुक्ल, अमोल मखरे, सतीश तारगावकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.











