इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज निमगाव केतकी येथे सिरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये तब्बल ११ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर इंदापूर तालुक्यात भिगवण, इंदापूर व बारामतीतील तपासणीतून एकूण ९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
निमगाव केतकी येथे झालेल्या सिरो सर्व्हेत १२ हजार ३५५ जणांची तपासणी करण्यात आली. त्याकरीता ४५ पथके नियुक्त केली होती. यामध्ये ६८ जण संशयित आढळले. त्यांची रॅपीड अॅंटीजेन तपासणी केल्यानंतर त्यातील ११ जण कोरोनाग्रस्त आढळले. ५६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये भिगवण येथील ७० वर्षाीय पुरूष, मदनवाडी येथील ४० वर्षीय महिला, अकोले येथील २५ वर्षीय युवक, २१ वर्षीय मुलगी, सिनार मास कंपनी ५१ वर्षीय पुरूष, बंडगरवाडी, पोंदवडी येथील १० वर्षीय मुलगा, १६ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये बेलवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, ३ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवती, ८ वर्षीय मुलगा, ७० वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगी, लाखेवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, भिगवण येथील ३५ वर्षीय पुरूष, टण्णू येथील ३३ वर्षीय पुरूष, चांडगाव येथील ४५ वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील ८ वर्षीय मुलगा, गणेशवाडी येथील ८० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
लासुर्णे येथील २५ वर्षीय युवक,२४ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, येथीलच ३३ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कुंभारगाव येथील २५ वर्षीय युवक, ३५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, १९ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष,१० वर्षीय मुलगा, २२ वर्षीय मुलगा व २३ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
बावडा येथील ६० वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील ३६ वर्षीय महिला, तक्रारवाडी येथील ४० वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय मुलगा, ७७ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
इंदापूर आंबेडकर नगर येथील २५ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, चांडगाव येथील ४५ वर्षीय पुरूष, खोरोची येथील २५ वर्षीय महिला, मदनवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, पिंपळे येथील ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बोरी येथील ३५ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, लुमेवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलाचा यामध्ये समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निमगाव केतकी येथील ४३ वर्षीय पुरूष, बिल्ट कॉलनीतील २५ वर्षीय पुरूष, ५१ वर्षीय महिला, भरणेवाडी येथील ९० वर्षीय महिला, बोरी येथील ३४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
काझड येथील १८ वर्षीय मुलगा, शेटफळगढे .येथील ३९ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय पुरूष, रोडेवाडा इंदापूर येथील ५३ वर्षीय महिला, इंदापूर-पडस्थळ रोड येथील ५७ वर्षीय पुरूष, १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
व्याहाळी येथील ५५ वर्षीय महिला, इंदापूर पाटील बंगला येथील ३३ वर्षीय पुरूष, पिटकेश्वर येथील ३० वर्षीय पुरूष, निरनिमगाव येथील ७७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त पुणे येथील बीजे मेडीकल महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या २५ नमुन्यांमध्ये ५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.










