बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमध्ये काल तपासणी झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ५२ जण माळेगाव, पणदरे व गुनवडी गावातील सिरो सर्वेक्षणात आढळले आहेत. या ५२ जणांमुळे बारामती तालुक्यात काल दिवसभरात १२६ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या व्यतिरिक्त इतर खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासले आहेत. मात्र त्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र गावागावात आता रॅपीड अॅंटीजेनचे कॅम्प घेण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीत गावागावात जाऊन सिरो सर्वे केले जात आहेत. मात्र बारामती, इंदापूर तालुक्यात असे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. आतापर्यंत ज्यांना वाटते, त्यांनी स्वतः येऊन तपासणी करण्याचेच प्रयोग झाले. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये ठराविक अंतरावर रॅपीड टेस्टचे कॅम्प घेतले जात आहेत. त्याचे अनुकरण बारामती, इंदापूरात होण्याची गरज आहे.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिगवण रोड येथील ४८ वर्षीय महिला, साईगणेश नगर येथील ५१ वर्षीय महिला, माळेगाव येथील १९ वर्षीय मुलगी, वाणेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, सिध्दार्थनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, मळद रोड येथील ३३ वर्षीय पुरूष, झारगडवाडी येथील ६० वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील १६ वर्षीय युवक, श्रीरामनगर येथील ३१ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील २४ वर्षीय पुरूष, देऊळगाव रसाळ येथील २७ वर्षीय महिला, निरावागज येथील ५९ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष व ३१ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, सगोबाचीवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येतील ५० वर्षीय पुरूष, कारखेल येथील ५० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील ५५ वर्षीय महिला, गुनवडी रोड येथील ३१ वर्षीय महिला, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथील २४ वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील ७० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय अॅंटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी येथील ६४ वर्षीय पुरूष, शंकरनगर येथील ७० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरूष, बारामतीतील ३४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेतील मंगल लॅबोरेटरी मध्ये आढळलेल्या ४७ कोरोनाग्रस्तांमध्ये देसाई ईस्टेट मधील ३४ वर्षीय पुरूष, चैतन्य रेसिडेन्सी साईनगर येथील ३६ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
विद्यानगरी येथील ३१ वर्षीय महिला, कसबा सय्यद अपार्टमेंट येथील ४८ वर्षीय पुरूष, महान्यूज, कसबा येथील ३८ वर्षीय पुरूष, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स सूर्यनगरी येथील २० वर्षीय युवक, अकबर मेन्शन सिनेमा रोड येथील ५५ वर्षीय महिला, सदगुरू नगर येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शतावरी अपार्टमेंट, देसाई इस्टेट येथील ४० वर्षीय पुरूष, तारांगण प्रेस्टीज त्रिमुर्तीनगर येथील २८ वर्षीय पुरूष, सिध्देश्वर मंदीरासमोरील ७६ वर्षीय महिला, जळोची येथील उत्कर्ष आर्किव्ह येथील ३५ वर्षीय पुरूष, महान्यूज, सिध्दार्थ हौसिंग सोसायटी येथील १४ वर्षीय मुलगी, सुभाष चौक येथील ६४ वर्षीय महिला, जेबीएस कॉम्प्लेक्स शेजारील ५४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सिध्देश्वर गल्ली येथील स्वामी समर्थ अपार्टमेंट येथील ७० वर्षीय पुरूष, पोस्ट ऑफिसशेजारील ४० वर्षीय पुरूष, माळेगाव रोड येथील म्हसोबा मंदिराशेजारील ३८ वर्षीय पुरूष, महान्यूज, भिगवण रोड येथील ६६ वर्षीय महिला, संघवी रेसिडेन्सी येथील ५१ वर्षीय पुरूष, शेळकेवस्ती, तांदूळवाडी येथील ५१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
त्रिमुर्तीनगर शेजारील इस्कॉन मंदिराशेजारील ८० वर्षीय महिला, मारवाड पेठेतील एकाच कुटुंबातील ६२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, ८४ वर्षीय महिला व ३४ वर्षीय पुरूष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
पिंपळी येथील ५१ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ३० वर्षीय पुरूष, माळेगाव शरद संकुलापाठीमागे ४८ वर्षीय पुरूष, पारवडी येथील ३१ वर्षीय पुरूष, कांबळेश्वर येथील ४५ वर्षीय महिला, चोपडज येथील ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
मोरगाव येथील ३२वर्षीय पुरूष, मेडद येथील ७० वर्षीय पुरूष व ५७ वर्षीय महिला, वाघळवाडी येथील ५९ वर्षीय महिला, महान्यूज, ६३ वर्षीय पुरूष, पारवडी येथील ५० वर्षीय पुरूष, शिरवली येथील ३२ वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील तिघे जण कोरोनाबाधित
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, निंबोडी येथील ५१ वर्षीय महिला व भिगवण येथील १२ वर्षीय महिला या तपासणीत कोरोनाबाधित आढळले आहेत.










