डॉ महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह
नागपंचमीचे औचित्य साधून निंबोडीचे माजी सरपंच प्रवीण घोळवे यांनी त्यांच्या विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान क्रीडा संकुलात एक आगळीवेगळी पतंग स्पर्धा आयोजित केली होती. गावातील लहान मुलांसोबतच महिला व मुलींनीही या स्पर्धेत उत्साहात सहभाग नोंदवला.
श्रावण महिन्यातील या अल्हाददायक व वनराईने नटलेल्या वातावरणामध्ये जवळपास 50 स्पर्धकांनी हिरीरीने भाग घेतला. करण कांबळे यांनी प्रथम तर प्रशांत घोळवे व पवन जगदाळे यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. पवन घमरे, हर्षद ढोले व शिवराज घोळवे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच प्रवीण घोळवे यांनी तर व्यवस्थापन माजी सरपंच महादेव घोळवे व ग्रामपंचायत सदस्य नारायण घोळवे यांनी केले. पंच म्हणून पोलीस पाटील मनोज होडशीळ तर सूत्रसंचालन डॉ महेश घोळवे यांनी केले. या स्पर्धेत नायलॉन मांजाला पूर्ण बंदी घालण्यात आली होती.











