विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
तुम्ही पतंग उडवण्याचा आनंद घ्या, पण नायलॉन मांजाचा वापर नको. सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नायलॉन मांजामुळे पक्षीच नव्हे, तर मानवाला देखील हानी पोहचत आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत.
सविस्तर वृत्त असे, बारामतीमधील स्मिता पाटील या आपल्या मुलांना मार्केट यार्डच्या पाठीमागच्या गेटच्या रस्त्यावरून मुलांना शाळेमध्ये घेण्यासाठी गाडीवरून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना मांजाचा गळ्याला स्पर्श झाला.
त्या वेळी त्यांनी तो मांजा हाताने पकडुन बाजूला केला. चालू गाडीमध्ये त्यानी मांजा बाजूला केला. मांजा बाजूला करत असताना मांजा बोटाला कापला होता. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यावेळी त्यांच्या बोटाला ५ टाके पडले. त्यामुळे बारामतीतील पोलिस नायलॉन मांजाबाबतीत काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.