बारामती : महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे बारामती तालुक्यातील लोणीभापकर या गावची! गेली 30 वर्ष सर्प पकडणारे सर्पमित्र विजय छबुराव यादव यांना सुप्यानजीक खराडेवाडी येथे मुरघासाच्या खड्ड्यात असलेला नाग पकडण्यासाठी गेले असता, नागाने दंश केला.
दंश केल्यानंतरही त्यांनी नागाला सुरक्षितरित्या बाहेर काढून निसर्गात सोडून दिले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी त्यांना हा साप चावला. दवाखान्यात सुरू असलेली त्यांची मृत्यूची झुंज मात्र पाच दिवसानंतर आज संपली.
विजय छबुराव यादव यांचे आज निधन झाले. 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या उपचाराला यश आले असे वाटले, परंतु आज त्यांची मृत्यूशी असलेली झुंज संपली. गेली 30 वर्ष ते साप पकडत होते. तसेच निसर्गात सोडून सापालाही जीवदान देत होते आणि नागरिकांवर आलेले संकटे दूर करत होते. त्यांच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.