साहेबांची भूमिका तीच आमची भूमिका, एकच नेता एकच पक्ष शरद पवार,शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांसोबतच,इंदापुर तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते पवार साहेबांच्या भेटीला गोविंद बागेत.
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमध्ये आले होते. राज्यातील सत्तांतर झाले आणि पहिल्यांदा शरद पवार बारामती मध्ये आले. शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे नागरिकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला. बारामती मध्ये शरद पवार यांना भेटण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी गोविंदबागेमध्ये गर्दी केली.
इंदापूर तालुक्यामधून शेकडो कार्यकर्ते गोविंद बागेमध्ये शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सागर मिसाळ महान्यूजशी बोलताना म्हणाले, शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेऊन इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा करण्याचा मानस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जी प्रेरणा मिळते. त्याच आमच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो.
शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादासाहेब थोरात म्हणाले, शरद पवार साहेब हे प्रेरणास्थान आहेत. शरद पवार साहेबांना भेटल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. शरद पवार साहेबांना भेटून गेल्यानंतर काम करताना पुन्हा साहेबांना भेटीपर्यंत ती ऊर्जा आम्हाला पुरेशी असते. त्यामुळे शरद पवार साहेबांना भेटणं हे महत्त्वाचं वाटतं. तसेच शरद पवार साहेबांकडे आल्यानंतर काम कशा पद्धतीने केलं पाहिजे.शिस्त म्हणजे काय? कष्ट आणि जिद्द म्हणजे काय?या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे आम्ही साहेबांना भेटत असतो. आम्ही सर्वजण शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे. शरद पवार साहेबांच्या बरोबर नेते नसले तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. भविष्यात देखील ज्या पद्धतीने शरद पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील.त्या पद्धतीने आम्ही काम करण्याच निश्चित केल आहे.
यावेळी महिला कार्यकर्त्या महान्यूज शी बोलत असताना म्हणाल्या, शरद पवार साहेब यांनी महिलांना जे आरक्षण दिलं आहे. जे महिला धोरण त्यांनी राबवलं आम्ही सर्व महिला इंदापूर तालुक्यातून शरद पवार साहेबांसोबत आहोत. शरद पवार साहेबांनी महिलांना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यामुळे आम्ही सन्मानाने जगत आहोत. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर काम करत असताना जी आम्हाला ऊर्जा मिळते तसेच महिला सबलीकरण,महिला सक्षमीकरण झालं त्याच्यामुळे आम्ही शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहे.आणि जी शरद पवार साहेबांची भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल.
इंदापूर तालुक्यातील सराटी गावांमधील कार्यकर्ते बोलताना म्हणाले, शरद पवारसाहेबांचे जे विचार आहेत. ते लोकांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचवायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांसोबतच राहायचं. शरद पवार साहेबांसोबत सर्वसामान्य जनता, कष्टकरी, गोरगरीब शरद पवार साहेबांसोबत राहणार आहे आणि साहेबांसोबत काम करणार आहे आणि नव्या जोमाने नवीन ऊर्जा मिळणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांसोबतच असणार आहे. असे मत इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी महान्यूजशी बोलताना व्यक्त केले.