जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
खंडाळा : सातारा -पुणे जाणाऱ्या महामार्गावरील खंबाटकी घाटातील पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यामधील लाईटचा असणारा अँगल तुटून रस्त्यावर ट्रकमध्ये घुसल्याची घटना घडली असून यात चालक किरकोळ जखमी झाला आहे तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा पुणे महामार्गावर असलेला खंबाटकी घाट यातील असलेला बोगद्यामधील लाईट असलेला अँगल अचानक तुटुन महामार्गावर चालत असलेल्या ट्रक मध्ये घुसला. यामुळे चालक किरकोळ जखमी झाला असला, तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या ठिकाणी झालेल्या अपघाताने घाटात मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा पाहायला मिळाल्या. महामार्गावर पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वाहातूक सकाळी सात वाजल्यापासुन वाहतूक खंबाटकी घाटाने पुर्वीचा मार्गाने पुणे बाजुकडे वळवली आहे. यासाठी भुईंज महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस वेळे (ता. वाई) येथे वाहतूक वळविण्यासाठी काम करीत आहेत. तर महामार्ग पोलीस अविनाश डेरेसह इतर पोलीस बोगदा येथे कार्यरत आहेत.