महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सरकार चालवता येत नसेल तर उध्दव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी रामदास आठवलेंच्या भेटीनंतर केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेतली.
उध्दव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. अशी मागणी यावेळी मदन शर्मा यांनी केली. “मी पोस्ट फॉरवर्ड केली होती पण उदय महेश्वरी यांनी चित्र काढल आहे. त्यांना पकडायच सोडून, मला पकडले ही त्यांची क्रिएटीव्हीटी असे मदन शर्मा म्हणाले.
मला चार वेळा फोन आला.काही शिवसैनिकांनी बातचीत करण्यासाठी बोलवले, मी गेलो पण मला मारहाण सुरू झाली असे त्यांनी सांगितले. संपूर्ण देश म्हणतोय हे सरकार बदलले पाहिजे, जर उध्दव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा .महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार लोकांना निवडून द्या. अशी मागणी मदन शर्मा यांनी केली.










