सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा सध्या पूर्ण झाला असून, यातील मतदार यादीवरील आक्षेपावर सुनावणी संपली. त्याचा निकाल जाहीर केला, त्यामध्ये ज्या मतदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे आला होता तो प्रादेशिक सहसंचालक व सह निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी निकाली काढला आणि छत्रपती कारखान्याचे 23031 सभासद हे निवडणूकीसाठी पात्र ठरले. अर्थात जर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार सभासद अपात्र झाले असते, तर अनेक गावांमध्ये नाममात्र सभासद राहिले असते, अशी आकडेवारी समोर आली आहे.
यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांचेसह संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत ज्या सभासदांना अपात्र करावे असा आक्षेप विरोधक सभासदांनी घेतला होता. त्यामध्ये महत्त्वाच्या गावांमधील बहुसंख्य सभासद हे अपात्र ठरले असते असे समोर आले आहे. त्यामुळे कारखान्याच्या अनेक सभासदांना याचा फटका बसला असता असे आकडेवारीवरून दिसते
कोणत्या गावातील किती मतदार अपात्र ठरले असते आणि प्रत्यक्षात किती राहिले असते पहा!
या आक्षेपानुसार लासुर्णे गटातील अ गटात १३९७ सभासद आहेत, त्यामध्ये 962 सभासदांवर आक्षेप होता थोडक्यात फक्त 435 सभासद या गावात राहिले असते. याच गावातील ब गटात 1650 सभासदांची संख्या आहे. त्यापैकी 1144 सभासद अपात्र ठरले असते आणि या गटात फक्त पाचशे सहा सभासद राहिले असते. म्हणजेच लासुर्णे गावात मिळून फक्त 941 मतदारांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता.
कळंब गावामध्ये 428 सभासद आहेत, त्यापैकी फक्त 129 सभासदांना मतदानाचा अधिकार राहिला असता जवळपास 299 सभासद अपात्र झाले असते. निमसाखर गावात देखील 673 पैकी तब्बल 495 मतदार अपात्र झाले असते आणि फक्त 178 सभासदांना मतदानाचा अधिकार राहिला असता. सणसर मध्ये 255 समासांपैकी फक्त 951 सभासद राहिले असते, तर तब्बल 1604 सभासद या प्रक्रियेतून बाद झाले असते.
हनुमान निंबोडी गावात 670 सभासदांपैकी 377 सभासदांना मतदानाचा अधिकार राहिला नसता, लामजेवाडी गावात 173 पैकी तब्बल 163 मतदार अपात्र ठरले असते व फक्त दहा मतदारांना मतदान करण्याचा अधिकार राहिला असता.
निरगुडे गावामध्ये 1214 पैकी तब्बल 998 जणांना अपात्र घोषित केले गेले असते व केवळ 216 जणच मतदानासाठी पात्र ठरले असते. लाकडी गावांमध्ये देखील 324 सभासदांपैकी तब्बल 246 मतदार अपात्र ठरले असते व केवळ 78 जणांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता. उद्धट गावामध्ये 978 पैकी 696 जणांचा मतदानाचा अधिकार गेला असता व फक्त 282 जणांनाच मतदान करता आले असते.
तावशी गावांमध्ये देखील 709 पैकी 506 जणांचा मतदानाचा अधिकार गेला असता व फक्त 203 जणांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता. जांब गावात देखील अशीच परिस्थिती असून 641 पैकी तब्बल 438 जणांचा मतदानाचा अधिकार रद्द झाला असता व केवळ 203 मतदानातदारांनाच मतदान करता आले असते.
कुरवली गावात देखील 707 पैकी तब्बल 470 जण अपात्र ठरले असते व फक्त २३७ जणांना मतदानाचा अधिकार राहिला असता. चिखली गावात 302 पैकी 203 जणांचा मतदानाचा अधिकार रद्द झाला असता व फक्त 99 सभासद उरले असते. अंथुर्णे गावात 1562 सभासदापैकी तब्बल 1234 जण अपात्र ठरले असते व केवळ 328 जणच मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकले असते.
बोरी गावात 1003 सभासद आहेत त्यापैकी तब्बल 694 जणांचा मतदानाचा अधिकार गेला असता व फक्त ३०९ जणांना मतदान करता आले असते. सिद्धेश्वर निंबोडी गावात 608 पैकी 527 जण अपात्र ठरले असते व केवळ 81 जणांना मतदान करता आले असते. काझड गावात देखील 1422 जणांपैकी 1066 जणांना मतदानाचा अधिकार उरला नसता व केवळ 356 जणच मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकले असते.
पिंपळे गावात देखील 464 पैकी 434 जणांना अपात्र घोषित केले गेले असते व केवळ 27 जण पात्र ठरले असते. शेळगाव गावात 1040 पैकी 901 जणांचा मतदानाचा अधिकार संपला असता व फक्त 139 जणांना मतदान करता आले असते. रणगाव गावात देखील 114 पैकी 99 जण मतदान प्रक्रियेतून बाद झाले असते व केवळ 15 जण मतदान करू शकले असते.
अकोले गावात 1022 पैकी तब्बल 831 जण मतदान प्रक्रियेतून बाहेर गेले असते व केवळ 191 जणांना मतदान करता आले असते. काटेवाडीत देखील 976 पैकी तब्बल 711 जण मतदान प्रक्रियेतून वगळले गेले असते व 265 जणांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता. सोनगाव गावात 2963 मतदारांपैकी फक्त 864 जणांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता. या गावातील तब्बल 2199 जणांचा मतदानाचा अधिकार अपात्र ठरला असता.
कन्हेरी गटामध्ये 635 पैकी 427 अपात्र ठरले असते व केवळ 208 जागा मतदानाचा अधिकार राहिला असता. गुणवडी गावात देखील 1514 पैकी तब्बल 1026 जणांचा मतदानाचा अधिकार गेला असता. पिंपळी गावात 653 पैकी 444 जणांचा मतदानाचा अधिकार वगळला गेला असता व या ठिकाणी फक्त 209 जणांनाच मतदान करता आले असते. बारामती शहरात देखील 179 मतदार आहेत त्यापैकी 143 अपात्र ठरले असते व केवळ 36 जण मतदार करू शकले असते.
जळोची गावात 326 पैकी 189 जण अपात्र ठरले असते व फक्त 134 जागा मतदानाचा अधिकार उरला असता. मेडद गावामध्ये 217 पैकी 119 अपात्र ठरले असते व फक्त 98 जणांनाच मतदानाचा अधिकार मिळाला असता. सावळ गावात देखील 304 पैकी 197 जणांना अपात्र ठरवले असते व फक्त 107 जणांना मतदान करता आले असते. तांदुळवाडी गावात 353 पैकी 209 अपात्र झाले असते व 144 मतदारांनाच मतदान करता आले असते, तर गोजुबावी गावात 185 पैकी तब्बल 157 जणांना मतदानापासून वगळले असते व फक्त 28 जणांनाच मतदान करता आले असते, तर रुई गावात २०५ पैकी 139 जण अपात्र ठरले असते व केवळ 66 जणांनाच मतदानाचा अधिकार राहिला असता.
कटफळ गावात 310 पैकी 286 अपात्र ठरले असते व केवळ 24 जणांना मतदान करता आले असते. थोडक्यात 29 हजार 518 मतदारांपैकी सभासदांपैकी बहुतांश सभासद अपात्र ठरले असते व केवळ 6487 एवढेच सभासदांना मतदान करता आले असते व छत्रपती कारखान्याचा नवा कारभारी कोण हे ठरवण्याचा अधिकार आला असता, मात्र या प्रादेशिक सहसंचालकाच्या निर्णयामुळे सर्व सभासदांच्या अधिकार सुरक्षित राहिले आहेत