बीड : महान्यूज लाईव्ह
घटना बीड जिल्ह्यातील.. शहरातल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रमशा शेख नावाची मुलगी या शाळेत नववी शिकत होती. शुक्रवारी अचानकच तिने भर वर्गात बाकावरच मान टाकली. तिला काय होतंय हे कळायच्या आधीच तिन्ही जगाचा निरोप घेतला होता.
शाळेच्या अभ्यास व अतितणावामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली. अर्थात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रामशा शेख गृहपाठ करत होती. शाळा आणि क्लास यामुळे टेन्शन येत असल्याचे पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी सुद्धा शाळा बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला.
या आधी देखील बीड जिल्ह्यातच दोन मार्च रोजी दहावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी दहावीतील विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. ही घटना पाटोदा शहरात घडली होती. सय्यद साद नावाच्या पंधरा वर्षीय मुलाचा यामध्ये मृत्यू झाला होता.