दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
स्वारगेटवरून महाबळेश्वरकडे निघालेल्या बसचा ब्रेक फेल झाल्याचे निमित्त घडले आणि पाचगणीला निघालेल्या भुईंजच्या किसनवीर महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या दुचाकीशी या बसचा अपघात झाला. या घटनेत या प्राध्यापिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संध्याकाळी वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात हा अपघात झाला.
या अपघातात प्रीती बोधे या 40 वर्षीय प्राध्यापक महिलेचा दुर्दैवी अंत झाला. आज संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात घडली. प्रीती बोधे या त्यांच्या दुचाकीवरून पाचगणीला निघाल्या होत्या.
ही बस (एम.एच. ०६ एस ८०५४) स्वारगेट वरून महाबळेश्वरकडे निघाली होती, तर प्रीती बोधे यांचे घर पाचगणी असल्याने त्या गावी निघाल्या होत्या. रस्ता सोडून बस थेट घाटाच्या कडेच्या भागात आली आणि गाडीखाली बोधे यांची दुचाकी या घटनेत दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले. गेली तीस वर्ष प्रीती बोधे या भुईंजच्या किसनवीर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूने महाविद्यालयासह परिसरातही शोककळा पसरली होती.